Pradosh Vrat | shubh muhurt
Pradosh Vrat | shubh muhurt team lokshahi

Pradosh Vrat 2022 : भाद्रपदाचा पहिला प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धती

जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धती
Published by :
Shubham Tate
Published on

Pradosh Vrat 2022 : हिंदू कॅलेंडरनुसार, प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला पाळले जाते. ऑगस्टचा शेवटचा प्रदोष व्रत भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला पाळला जाईल. म्हणजेच भादोचे पहिले प्रदोष व्रत बुधवार, 24 ऑगस्ट रोजी ठेवण्यात येणार आहे. बुधवारचा दिवस असल्याने त्याला बुध प्रदोष व्रत म्हटले जाईल. या दिवशी भगवान शिव आणि गणेशाची पूजा केल्याने जीवनातील प्रत्येक अडचणी दूर होतात असे म्हणतात. हे व्रत केल्याने तुम्हाला हवे ते वरदान मिळू शकते. (pradosh vrat 2022 of bhadrapada month shubh muhurt and pujan vidhi)

प्रदोष व्रताचे महत्त्व

प्रदोष व्रत भगवान शिवाला समर्पित मानला जातो. प्रदोष व्रतामध्ये भगवान शिवाची उपासना केल्याने रोग, ग्रह दोष, दु:ख यासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते. विवाहित लोकही संततीप्राप्तीसाठी हे व्रत करतात. भगवान शिवाच्या कृपेने धन, धान्य, सुख-समृद्धी वाढते.

Pradosh Vrat | shubh muhurt
Parle-G च्या या निर्णयाचं होतंय कौतुक, कंपनीचे नुकसान होईल का?

प्रदोष व्रत तिथी आणि वेळ

भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी बुधवार, 24 ऑगस्ट रोजी सकाळी 08.30 वाजल्यापासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवार, 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10.37 पर्यंत चालेल. अशात प्रदोष पूजेचा मुहूर्त 24 ऑगस्टला त्रयोदशी तिथीला असेल, त्यामुळे बुद्ध प्रदोष व्रत 24 ऑगस्टलाच ठेवला जाईल. बुद्ध प्रदोष व्रताच्या पूजेचा शुभ मुहूर्त 06:52 ते रात्री 09:04 पर्यंत असेल.

Pradosh Vrat | shubh muhurt
शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, भाजपसोबतची जवळीक कायम ठेवणार?

प्रदोष व्रत पूजन विधी

प्रदोष व्रताच्या दिवशी सूर्यास्ताच्या ४५ मिनिटे आधी आणि सूर्यास्तानंतर ४५ मिनिटांनी शंकराची पूजा करण्याचा नियम आहे. या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. या व्रतामध्ये हलके लाल किंवा गुलाबी रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते. चांदीच्या किंवा तांब्याच्या पात्रातून शुद्ध मध शिवलिंगाला अर्पण करा.

त्यानंतर शुद्ध पाण्याच्या प्रवाहाने अभिषेक करून "ॐ सर्वसिद्धि प्रदाये नमः" या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. भगवान शंकराला फुले, फळे आणि मिठाई अर्पण करा. तुमच्या समस्येसाठी भगवान शिवाची प्रार्थना करा. प्रदोष व्रत कथा वाचा आणि शिव चालिसा वाचा. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप अवश्य करावा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com