Optical Illusion | या चित्रात तीन मुली शोधून दाखवा!
सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो व्हायरल होत असतात. लोकांना कन्फ्यूज करणारी, त्यातील रहस्य उलगडण्यात लोकांना चांगलीच मजा येते. म्हणूनच आज एक वेगळ्या धाटणीचा फोटो घेऊन आलो आहोत. हा फोटो पाहून अनेक जण संभ्रमणात पडले आहेत.
ऑप्टिकल इल्युजनमुळे मेंदूचा व्यायाम
या चित्रात तुम्हाला तीन मुली शोधायच्या आहेत. या चित्रात माणूस दिसतोय आणि यात तुम्हाला तीन मुली शोधायच्या आहेत. हे चित्र नीट बघा, तुम्हाला यात तीन मुली दिसतायत का? तुम्हाला या मुली लवकरात लवकर शोधायच्या आहेत. अशा कोड्यांची उत्तरे शोधताना आपल्याला डोकं शांत आणि मन एकाग्र ठेवावं लागतं. ऑप्टिकल इल्युजनमुळे मेंदूचा व्यायाम होतो.
प्रथमदर्शनी या चित्रात आपण जे बघतो तेच सत्य असेल असं नसतं त्यामुळे या चित्रांना ऑप्टिकल भ्रम असं म्हटलं जातं. आता तरी तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का? या चित्रात या माणसाच्या दाढीजवळ, मानेजवळ आणि नाकाजवळ बघा. इथे तुम्हाला काही दिसतंय काय? हे चेहरे या तीन ठिकाणीच लपलेले आहेत. तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल तर तुम्ही हुशार आहात. नसेल सापडलं तर आम्ही तुम्हाला याचं उत्तर देत आहोत.