oil massage on feets
oil massage on feetsTeam Lokshahi

जाणून घ्या, पायाला तेल लावून मसाज करण्याचे फायदे...

उपाय म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट तेलानं किमान दहा मिनिटं पायांच्या तळव्यांना मसाज केल्यास पायाकडील रक्तप्रवाह सुधारतो.
Published by :
Saurabh Gondhali
Published on

तळपायांना मसाज करण्याचे फायदे.

1.बैठ्या जीवनशैलीमुळे पायांच्या स्नायुंची पुरेशी हालचाल होत नाही. दिवसभर पायात घट्ट बूट, सॅण्डल घातल्याने, उंच टाचेची पादत्राणे वापरल्यानं पायाकडील रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे पायांचे  स्नायू दुखावतात. पाय, पोटऱ्या, घोटे , टाचा दुखतात. यावर उपाय म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट तेलानं किमान दहा मिनिटं पायांच्या तळव्यांना मसाज केल्यास पायाकडील रक्तप्रवाह सुधारतो. संपूर्ण शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा होतो. निरोगा आरोग्यासाठी रोज रात्री पायांच्या तळव्यांना तेलाचा मसाज (oil massage on feets) करणं आवश्यक आहे. 

oil massage on feets
oil massage on feets

2. दिवसभर बसून, उभं राहूण, चालून शरीर थकतं, शरीराच्या विविध स्नायुंवर ताण येतो. पायही सूजतात. हा थकवा,  ताण घालवण्यासाठी, पायाला आलेली सूज कमी करण्यासाठी पायाच्या तळव्यांना तेलाचा मसाज करावा. 

3. रात्री झोपण्यापूर्वी पायाला मसाज केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. दिवसभराचा थकवा निघून जाऊन रात्री शांत झोप येते. शांत झोपेसाठी पायांच्या तळव्यांना तेलाचा मसाज आवश्यक आहे. 

oil massage on feets
oil massage on feets

4. शरीर दुखत असल्यास, एखाद्या अवयवाचे स्नायू दुखत असल्यास पायांच्या तळव्यांना तेलाचा मसाज करावा. पायाच्या तळव्यांना तेलाचा मसाज केल्यास मानदुखी, डोकेदुखी, पाठदुखी, मायग्रेन या वेदनांवर आराम मिळतो.

5. दिवसभर मूड चांगला राहाण्यासाठी, औदासिन्याची ( डिप्रेशनची) (depression) लक्षणं कमी करण्यासाठी रात्री पायाच्या तळव्यांना 4-5 मिनिटं तेलाचा मसाज करावा असं तज्ज्ञ सांगतात. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com