Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

दारापुढे रांगोळी काढताना तिच जुनी पांढऱ्या रंगाच्या रांगोळीनेच नक्षी काढणं सोडा यावर्षी दारापुढे नवरात्रीच्या नऊ रंगांप्रमाणे त्या त्या रंगाची रांगोळी वापरून देवीचे पाऊले काढा.
Published by :
Team Lokshahi
Published on

गणपती झाले की चाहूल लागते ती नवरात्रीची नवरात्रीमधील नऊ रंगांचे पोशाख, देवीच्या दरबारासमोर केला जाणारा गरबा, तसेच वेगवेगळ्या पंचपकवानांचा आस्वाद घेणं. नवरात्रीचे नऊ दिवस हे स्त्रीजागरणाचे असून ते उत्साहाचे आणि आनंदाचे असतात. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आणि मंगलमय अशी ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. गणपतीनंतर हिंदू सणांना सुरुवात होते त्यात लगेच नवरात्रोत्सव आणि दिवाळी अगदी तोंडावर येते अशावेळी घरात प्रसन्नता कायम राखण्यासाठी दारापुढे सुंजर अशी रांगोळी काढली जाते. नुकतीच नवरात्री जवळ आली आहे अशावेळी दारापुढे देवीचे सुंदर पाऊले रांगोळीच्या मदतीने काढण्यासाठी अनेक अशा नक्षी आहेत. अशाच सुंदर नक्षी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत या नक्षी तुमच्या दारापुढे काढल्याने घरातील उंबरठ्याला पाहून मन प्रसन्न होईल.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नऊरात्रीच्या नऊ रंगाची यादी आली आहे. यावेळी दारापुढे रांगोळी काढताना तिच जुनी पांढऱ्या रंगाच्या रांगोळीनेच नक्षी काढणं सोडा यावर्षी दारापुढे नवरात्रीच्या नऊ रंगांप्रमाणे त्या त्या रंगाची रांगोळी वापरून देवीचे पाऊले काढा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com