Men Skin Care: उन्हाळ्यात पुरुषांच्या त्वचेची अशी घ्या काळजी
महिलांना त्यांच्या त्वचेची काळजी घेण्याची गरज असते तसचं पुरुषांनाही त्वचेची काळजी घेणे आवश्यक असते. खरं तर, स्त्री असो किंवा पुरुष, प्रत्येकाची त्वचा उन्हाळ्यात खूप निस्तेज होते. तीव्र सूर्यप्रकाश आणि धुळीच्या वादळाचा थेट परिणाम लोकांच्या त्वचेवर होतो. याच्या प्रभावामुळे त्वचेवर अनेक प्रकारच्या समस्या दिसू लागतात. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात पुरुषांच्या त्वचेचीही काळजी घ्यावी लागते. आज आम्ही तुम्हाला पुरुषांसाठी त्वचेची काळजी घ्याल हे सांगणार आहोत.
क्लींजिंग
महिलांप्रमाणे पुरुषांनेही रोज चेहरा क्लींजिंग करावे. त्वचेची काळजी घेण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे.
एक्सफोलिएट
त्वचेला एक्सफोलिएट केल्याने त्वचेच्या मृत पेशी निघून जातात. यासाठी तुम्ही साखर आणि मध वापराने त्वचेला एक्सफ़ोलीएट करु शकता.
टोनिंग
पुरुषांच्या त्वचेची मोठी छिद्रे बंद करण्यासाठी चांगला टोनर वापरावा. त्वचा स्वच्छ केल्यानंतर टोनर नियमित प्रमाणे लावा.
मॉइश्चरायझर
उन्हाळ्यात त्वचेवर मॉइश्चरायझरचा वापर करावा. याच्या वापराने तुमची त्वचा हायड्रेट राहते.
सनस्क्रीन
पुरुषांनी देखील सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे. पुरुष बहुतांशी घराबाहेर राहतात. अशा परिस्थितीत त्यांनी सनस्क्रीन न वापरल्यास त्यांच्या चेहऱ्यावर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.