आब्यांच्या कोयचे फायदे माहीत आहेत का?
आंबा (Mango) या फळाचे नाव काढले तरी तोंडाला पाणी येते. आंबा जेवढा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तेवढाच त्यामध्ये असलेल्या कोयीचेही आरोग्यासाठी अनेक फायदेशीर आहे. जर तुम्ही आंबा खाऊन झाल्यावर कोय फेकून देत असाल तर असे करू नका. कारण आंब्यामध्ये जेवढे पोषक घटक आढळतात तेवढेच आंब्याच्या कोयीमध्ये आढळतात.
आंब्याच्या कोयीचा कोलेस्ट्रॉल (Cholesterol) आणि ह्रदयाशी संबंधित आजारांवर लढण्यासाठी शक्ती मिळते. यासाठी चला जाणून घेऊया काय आणि कोणते फायदे आहेत.
आंब्याच्या कोयीचे फायदे
1. लूज मोशन या सारख्या समस्या जाणवत असतील तर आंब्याच्या कोयीची (Mango Seed) बारीक तुकडे करून त्याची पावडर करून एक ग्लास पाण्यातून पावडर आणि मध घालून प्यायल्याने तुम्हला थोडा फरक जाणवले.
2.ह्रदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी आंब्याच्या कोयीचा उपयोग केला जातो. त्यामुळे रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहते. आंब्याच्या कोयीचे सेवन केल्याने आरोग्यास त्याचा फायदा होतो.
3.केस (Hair) गळणे कमी करायचे असतील आणि केसामधील कोंडा कमी करण्यासाठी आंब्याच्या कोयीची मदत होते.
4.तसेच त्वचेचा रोग यासाठी आंब्याच्या कोयची मदत होते.
5. अनेकांना अॅसिडिटीच्या समस्येचा त्रास होत असतो. त्यांच्यासाठी आंब्याच्या कोयीची पूड बनवून तिचा चांगला उपाय आहे. आंब्याच्या बियांमध्ये फिनॉल आणि फिनोलिक संयुगे आढळतात. त्यामुळे पचनास प्रक्रिया होण्यास मदत होते.
6. आंब्याच्या कोयची पावडर खाल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यासाठी मदत होते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित राहण्यास मदत होते.