गणपती बाप्पाचे स्वागत करा जल्लोषात; बनवा 'या' 5 पद्धतीचे मोदक
राज्यात नुकताच दहिहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. आता गणपती उत्सवाची लगबग सुरु झाली आहे. गणेश उत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेश उत्सव संपूर्ण भारतात साजरा केला जातो, या वर्षी गणेश चतुर्थीचा उत्सव 31 ऑगस्ट 2022 पासून सुरू होत आहे. तुम्ही देखील आपआपल्या गणपती बाप्पाचे स्वागत करणार परंत गणपती बाप्पाला मोदक आणि लाडू सर्वात जास्त आवडतात हे तुम्हाला माहित आहे. चला तर तुम्हाला मोदकाच्या विविध प्रकारांची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
1. चॉकलेट मोदक
आजकाल मुलांना चॉकलेट मोदक खायला आवडतात. तुम्हाला मंद आचेवर मिल्कमेड शिजवावी लागेल. यानंतर त्यात कोको पावडर टाकून पेस्ट घट्ट करावी लागेल. यानंतर तुम्ही मोदक साच्यात टाका आणि वाफ द्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात तुमच्या आवडीचे स्टफिंगही भरू शकता. त्यासाठी तुम्ही ड्राय फ्रूट्स वापरू शकता.
2. केसरी मोदक
केसरी मोदक बाप्पाला खूप आवडतात. तुम्हालाही त्याचा आनंद घ्यायचा असेल तर तांदळाच्या पिठात तूप, काजू, बेदाणे, केशर पाणी (पाण्यात भिजवलेले), नारळ पावडर आणि गूळ मिसळा. नंतर त्यात गरम पाणी घालून पिठाचा आकार द्या. हे पीठ 10 मिनिटे सोडा. आता स्टीमर तयार करा, मोदकामध्ये सारण भरून तुम्ही हे मोदक वाफवू शकता.
3. साखरमुक्त मोदक
तुमच्या घरात मधुमेहाचे रुग्ण असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी शुगर फ्री मोदक बनवू शकता. ते बनवण्यासाठी विविध प्रकारचे ड्रायफ्रुट्स आणि खोबरे कापून हलक्या तुपात तळून घ्या. यानंतर खजूर दुधात भिजवल्यानंतर मनुका पेस्ट तयार करा. गॅसवर थोडा वेळ शिजवून घ्या आणि नंतर त्यात सारण भरून मोदक तयार करा.
4. बर्फीचे मोदक
बर्फी मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम काजू तुपात भाजून त्याची पेस्ट तयार करा. यानंतर त्यात खवा, साखर आणि दूध घालून घट्ट करा. यानंतर स्टफिंगसाठी ड्रायफ्रुट्स भरून मोदक वाफवून घ्या. लगेच तुमचे मोदक तयार होतील.
5. तळलेले मोदक
तळलेले मोदक तयार करण्यासाठी पीठ मळून घ्या आणि त्यात ड्रायफ्रुट्स आणि खव्याचे सारण भरा. त्यानंतर मोदक तळून घ्या. तुमचे तळलेले मोदक तयार आहेत. बाप्पाला गरमागरम अर्पण करा.