Hair Spa Cream: घरच्या घरी 'या' नैसर्गिक घटकांपासून तयार करा हेअर स्पा क्रीम

Hair Spa Cream: घरच्या घरी 'या' नैसर्गिक घटकांपासून तयार करा हेअर स्पा क्रीम

तुमच्या जवळ ही हेअर स्पा साठी वेळ नाही? तर त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही कारण तुम्ही हेअर स्पा घरीच करू शकता.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

तुमच्या जवळ ही हेअर स्पा साठी वेळ नाही? तर त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही कारण तुम्ही हेअर स्पा घरीच करू शकता. यासाठी तुम्हाला काही नैसर्गिक गोष्टींची आवश्यकता लागेल, ज्याचा वापर करून तुम्ही घरच्या घरी हेअर स्पा क्रीम बनवू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे नैसर्गिक हेअर स्पा क्रीम टाळूवरही लावू शकता. तर जाणून घेऊया हेअर स्पा क्रीम कशी बनवायची.

कोकोनट हेअर स्पा क्रीमसाठी लागणारे साहित्य:

नारळ

कोरफड

मुलतानी माती

दही

केळी

कोकोनट हेअर स्पा क्रीम बनवण्याची कृती:

कोकोनट हेअर स्पा क्रीम बनवण्यासाठी प्रथम तुम्हाला नारळाचे दूध आवश्यक आहे.अर्धा नारळ किसून घ्या आणि पातळ कापडात टाकून दूध काढा. यानंतर त्यात दोन चमचे कोरफड घाला व त्यानंतर त्यात तीन चमचे मुलतानी माती घाला. त्यात दोन चमचे दही घालून एक केळी मॅश करून टाका. ते क्रीम स्वरूपात तयार करा.

कसे लावायचे ते जाणून घ्या...

हे क्रीम तुमच्या केसांवर लावण्यासाठी तुम्हाला तुमचे केस धुवून स्वच्छ करावे लागतील. लक्षात ठेवा की तुमच्या केसांमध्ये धूळ, घाण किंवा तेल नसावे. यानंतर, ओल्या केसांना क्रीम लावा. तुम्ही ते टाळूवरही लावू शकता. 20 मिनिटे राहू द्या. त्यानंतर सामान्य पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्ही शॅम्पूने केसांपासून ते पूर्णपणे काढून टाकू शकता परंतु कंडिशनर वापरू नका. केस धुतल्यानंतर केस खूप मऊ दिसतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com