लिंबाचा रस आणि मधात लावल्याने चेहरा होईल सॉफ्ट, 'या' समस्यांपासून मिळेल सुटका

लिंबाचा रस आणि मधात लावल्याने चेहरा होईल सॉफ्ट, 'या' समस्यांपासून मिळेल सुटका

मध आणि लिंबू या दोघांचे स्वतःचे फायदेशीर गुणधर्म आहेत. हे दोन्ही आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत.
Published on

Lemon and Honey : मध आणि लिंबू या दोघांचे स्वतःचे फायदेशीर गुणधर्म आहेत. हे दोन्ही आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. मध बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे, तर लिंबू अँटीव्हायरल आहे. संसर्ग टाळण्यासाठी आणि बरा करण्यासाठी दोन्ही गोष्टी घरगुती उपाय म्हणून वापरु शकतो. जाणून घ्या काय होतात फायदे...

डेड पेशी

लिंबू आणि मध हे दोन्ही त्वचेसाठी उत्कृष्ट स्क्रबचे काम करतात. लिंबू आणि मधाची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने मृत पेशी निघून जातात आणि आतून छिद्रे साफ होतात. यामुळे त्वचेची छिद्रे ब्लॉक होण्यापासून बचाव होतो, त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स होत नाहीत. यासोबतच लिंबू आणि मध चेहऱ्याला हायड्रेट ठेवण्यास आणि त्वचेला आतून पोषण देण्यास मदत करतात.

ग्लोईंगसाठी प्रभावी

लिंबू आणि मधाची पेस्ट त्वचा ग्लोईंगसाठी खूप उपयुक्त आहे. पिगमेंटेशन कमी करण्यासोबतच त्वचेवर ग्लोही येतो. याशिवाय, त्यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेच्या आतील प्रदूषण आणि अतिनील किरणांमुळे होणारे सूक्ष्म रॅडिकल्सचे नुकसान कमी करतात आणि त्वचा ग्लो करण्यास मदत करतात.

डागांवर उपचार

लिंबूमध्ये असलेले आम्ल घटक डाग कमी करण्यास मदत करतात. मधामध्ये असलेले अँटीमाइक्रोबियल गुणधर्म चेहऱ्यावरील डाग दूर करण्यातही खूप मदत करतात.

सनबर्न

लिंबू आणि मधाची पेस्ट सूर्यप्रकाशामुळे होणारी सनबर्न कमी करण्यास मदत करते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आढळते जे सनबर्नपासून संरक्षण करते आणि मध त्वचेला थंड ठेवते.

डार्क सर्कल्स

डार्क सर्कल्सचा तुमच्या सौंदर्यावर परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत डार्क सर्कल्सवर लिंबू आणि मधाची पेस्ट लावू शकता. डार्क सर्कल्स कमी करण्यासोबतच चेहरा हायड्रेट ठेवतो. डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी झोपण्यापूर्वी डोळ्याखाली लावा आणि २० मिनिटांनी धुवा.

सुरकुत्या

लिंबातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेतील कोलेजन वाढवतात आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करतात. यासोबतच मध त्वचेला मॉइश्चरायझ करते. हे दोन्ही चेहरा हायड्रेट ठेवतात आणि सुरकुत्या येण्यापासून प्रतिबंधित करतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com