पांढरे केस लपवणं आता सहज शक्य; पाहा ट्रिक्स
केसांच्या अनेक तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. केस गळणे, पांढरे होणे, कोरडे होणे. अशा अनेक तक्रारींचा सामना करावा लागतो आहे. यासाठी वेगवेगळ्या शॅम्पूंचा वापर करावा लागतो. मात्र या शॅम्पूंचा चांगलाच फायदा होतो असे नाही.
केस पांढरे होणं ही समस्या तर तरुण - तरुणींनासुद्धा आता जाणवू लागली आहे. मात्र काही सोप्या टिप्सच्या मदतीनं तुम्ही तुमचे पांढरे केस कलर न करतासुद्धा लपवू शकता.
फ्रेंच ब्रेड स्टाइलच्या (French Braid Style) माध्यमातूनही तुम्ही मुळापासून पांढरे केस सहजपणे लपवू शकता. विशेष म्हणजे या लूकमधल्या महिला अधिक स्टायलिश दिसतात आणि पांढरे केससुद्धा दिसून येत नाहीत.
हेडस्कार्फ (Headscarf) हा अनेक कारणांसाठी उपयुक्त आहे. बहुतांश पांढरे केस लपवता येतात. तसेच कोरडे पडलेले केसही झाकून घेता येतात.
पांढरे केस लपवण्यासाठी हेअर पार्टिंग (Hair Parting) ही पद्धतही फायदेशीर ठरू शकते. तुमचे एकाच बाजूचे केस पांढरे असतील, तर भांग पाडण्याची पद्धत बदलावी. दुसऱ्या बाजूने केसांचा भांग पाडल्यास किंवा ते वळवल्यास पांढरे केस दिसून येणार नाहीत.