weight loss
weight lossTeam Lokshahi

How to lose weight faster : झटपट वजन कमी करायचे आहे; पाहा तर मग उपाय

वाढतं वजन ही आजकालच्या काळात एक समस्याच झाली आहे. २४ तास एका जागी बसून काम करणा-या व बिझनेस करणा-या तरुणांमध्ये तर ही समस्या जास्त जाणवत आहे
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

वाढतं वजन (weight gain)ही आजकालच्या काळात एक समस्याच झाली आहे. २४ तास एका जागी बसून काम करणा-या व बिझनेस करणा-या तरुणांमध्ये तर ही समस्या जास्त जाणवत आहे. जीममध्ये (gym) जाऊन एक्सरसाईज (exercise) करण्याइतका देखील वेळ मिळत नाही. जर तुम्ही देखील वाढत्या वजनामुळे त्रस्त आहेत, तर अशा काही टिप्स सांगणार आहोत. ज्या तुम्ही फॉलो केल्या तर झटपटवजन कमी (weight loss)करु शकाल

आयुर्वेदात प्रत्येक आजारावर उपाय उपलब्ध असतात. त्याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. वजन कमी करण्यासाठी कोणतीही औषधे घेऊ नका . चला तर जाणून घेऊया अशा टीप्स जी लठ्ठपणा कमी करुन तुम्हाला देतील आकर्षक लुक!

उत्तरासन

पोटाच्या चरबीची समस्या आहे त्यांच्यासाठी ही मुद्रा खूप चांगली सिद्ध होऊ शकते. पोट, छाती, खांदे, इत्यादी ताणण्यासाठी पुरेसे आहे. आपल्या पाठीच्या स्नायूंना आराम आणि मजबूत करण्यास मदत करते. शरीराचा आकार सुधारण्यासाठी ही आसन उपयुक्त आहे.

त्रिकोणासन

पायावर उभे राहण्याची स्थिती आहे. हे स्थिरता वाढवण्यास तसेच मणक्याला लवचिक बनविण्यात मदत करते. हे तुमच्या शरीराच्या अवयवांसाठी देखील चांगले आहे

अधोमुख, श्वासासन

शरीराची ताकद वाढवण्याचे काम करते आणि शरीरात योग्य संतुलन देखील निर्माण करते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी, डोकेदुखी कमी करण्यासाठी, थकवा कमी करण्यासाठी, खराब पचन बरे करण्यासाठी हे खूप चांगले सिद्ध होऊ शकते.

पश्चिमोत्तासन

आसन तुमच्या शारीरिक लवचिकतेसाठीही चांगले आहे. मधुमेह आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील हे एक चांगले आसन आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com