आठवड्यातून कितीवेळा केस धुणे फायदेशीर? जाणून घ्या
केसांचीही नियमित स्वच्छता करणं गरजेचे आहे. आपले केस निरोगी आणि सुंदर दिसावेत, अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यासाठी लोक केसांवर वेगवेगळे उपचार करतात. महिलांचे लांब आणि दाट केस त्यांच्या सौंदर्यात भर घालतात.
सर्वांना मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे आठवड्यातून कितीवेळा केस धुणे फायदेशीर आहे. तर लके आणि पातळ केस असलेल्या लोकांनी जर जास्त वेळ केस धुतले नाहीत तर त्यांचे केस निर्जीव आणि कमकुवत दिसू लागतात. दाट आणि कुरळे केस असलेले महिलांनी जरी त्यांचे केस बराच काळ धुतले नाहीत, तरी त्यांचे केस निर्जीव दिसत नाहीत.
केसांची योग्य काळजी न घेतल्याने केस झपाट्याने गळू लागतात किंवा पांढरे होतात. आठवड्याच्या प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी केस धुवावेत. जर एखाद्याला खूप घाम येत असेल तर त्याला वारंवार केस धुवावे. केस आठवड्यातून फक्त दोन दिवस सल्फेट शैम्पू किंवा हार्ड शॅम्पूने धुवावेत.केसांना खाज सुटत असेल किंवा टाळूला खाज येत असेल तर तुम्ही केस दर दुसऱ्या दिवशी धुवू शकता.