Hair Care : उन्हामुळे केस झालेत खराब? 'या' 5 घरगुती उपायांनी बनवा चमकदार

Hair Care : उन्हामुळे केस झालेत खराब? 'या' 5 घरगुती उपायांनी बनवा चमकदार

उन्हाळ्यात सूर्यप्रकाशाचा परिणाम केवळ चेहऱ्यावरच नाही तर केसांवरही होतो. पण, केसांना उष्णतेपासून वाचवण्यात सगळेच जण अपयशी ठरतात.
Published on

Hair Care : उन्हाळ्यात सूर्यप्रकाशाचा परिणाम केवळ चेहऱ्यावरच नाही तर केसांवरही होतो. त्वचेवर सनस्क्रीन लावून तुम्ही त्याचे संरक्षण करू शकता. पण, केसांना उष्णतेपासून वाचवण्यात सगळेच जण अपयशी ठरतात. त्यामुळे केस हळू हळू तुटायला लागतात आणि ड्राय होतात. जर तुम्हीही या सर्व समस्यांनी त्रस्त असाल तर आम्ही तुम्हाला डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. जे तुमचे केस मऊ आणि चमकदार बनवू शकतात.

Hair Care : उन्हामुळे केस झालेत खराब? 'या' 5 घरगुती उपायांनी बनवा चमकदार
Hair Care Tips : मेहंदी लावताना 'ही' घ्या काळजी; अन्यथा होतील गंभीर परिणाम

कोमट तेलाने केसांची चंपी करा

उन्हात केसांची आर्द्रता निघून जाते आणि केसांची मुळे कमकुवत होऊ लागतात. अशा परिस्थितीत केसांना पोषणाची गरज असते. यासाठी केसांच्या मुळांना कोमट खोबरेल किंवा ऑलिव्ह ऑईल लावा. केस गळण्याची समस्या असेल तर त्यापासूनही सुटका मिळेल.

नैसर्गिक शॅम्पू वापरा

उष्णतेमुळे केसांची चमक कुठेतरी हरवते. हिटचे नुकसान कमी करण्यासाठी हार्ड शॅम्पू वापरणे टाळा. बाजारातून बनवलेला कोणताही आयुर्वेदिक किंवा एलोवेरा जेल शॅम्पू वापरावा. यामुळे केसांना ओलावा मिळेल आणि चमकही येईल.

हेअर मास्कचा वापर

हेअर मास्क लावणे देखील आवश्यक आहे. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात. केस मऊ होतात आणि डॅमेज कंट्रोल होते. हेअर मास्क करण्यासाठी केळी मॅश करून त्यात दोन ते तीन चमचे बदामाचे तेल मिसळा. हे मिश्रण केसांच्या लांबीपासून मुळापर्यंत पूर्णपणे लावा, 15 ते 20 मिनिटे राहू द्या आणि नंतर केस धुवा.

चहाच्या पाण्याने केस धुवा

जर केस खूप खराब झाले असतील तर त्यासाठी तुम्ही चहाच्या पाण्याचाही वापर करु शकता. यासाठी अर्ध्या वाटी पाण्यात चहाची पाने टाकून उकळा. पाणी थंड झाल्यावर त्याने केस धुवा आणि केस टॉवेलमध्ये गुंडाळून १५ ते २० मिनिटे ठेवा, त्यानंतर केस सामान्य पाण्याने धुवा. यामध्ये असलेले कॅफेन केसांच्या दुरुस्तीसाठी मदत करते. कोरडेपणा दूर होतो.

केस झाकून उन्हात जा

जेव्हाही घराबाहेर पडाल तेव्हा सुती कापडाने केस झाकून ठेवा. जेणेकरून केसांना व्यवस्थित हवा मिळेल आणि उष्णतेचा परिणाम केसांवर होणार नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com