Healthy Tips : निरोगी राहण्यासाठी फॉलो करा 'या' महत्त्वाच्या टीप्स
(1) योग्य आहार घ्यावा.
हेल्दी राहण्यासाठी पोषकघटकांनी परिपूर्ण आणि संतुलित आहार घ्यावा. यासाठी तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, फळभाज्या, शेंगभाज्या, धान्ये, कडधान्ये, सुकामेवा, दूध, दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे यांचा समावेश करा.
(2) पुरेसे पाणी प्यावे
दररोज दिवसभरात किमान आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. यामुळे शरीरात डिहायड्रेशन होत नाही. शरीरातील अपायकारक घटक लघवीवाटे बाहेर निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे पुरेसे पाणी प्यावे. याशिवाय रसदार फळे, ताज्या फळांचा रस, उसाचा रस, शहाळ्याचे पाणी यासारख्या तरल पदार्थ आहारात समाविष्ट करू शकता.
(3) अयोग्य आहार खाणे टाळावे
वारंवार चरबी वाढवणारे पदार्थ, तेलकट पदार्थ, साखरेचे पदार्थ, खारट पदार्थ, मैद्याचे पदार्थ, जंकफूड, फास्टफूड खाणे टाळावेत. बाहेरचे उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावेत. चहा, कॉपी, कोल्ड्रिंक्स यांचे प्रमाणही कमी करावे.
(4) व्यसनांपासून दूर राहावे
तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्यपान अशा सर्वच व्यसनांनी आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी अशा व्यसनांपासून दूर राहावे.
(5) नियमित व्यायाम करावा
हेल्दी आहाराच्या जोडीला नियमित व्यायामाची साथ द्या. नियमित व्यायाम केल्याने वजन आटोक्यात राहते. शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. दररोज किमान अर्धा तास चालण्याचा व्यायाम करावा. तसेच सायकलिंग, पोहणे, दोरीउड्या, डान्स, पायऱ्या चढणे उतरणे, मैदानी खेळ असे व्यायाम करू शकता.
(6) पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी
कामाच्या व्यापात विश्रांतीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. कामाबारोबरच विश्रांतीही तितकीच महत्त्वाची आहे. दररोज पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी. दररोज किमान सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते.
(7) तणावापासून दूर राहावे
मानसिक ताण यापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी कोणताही ताण घेऊ नका. तणाव दूर करण्यासाठी छंद जोपासावा, मनोरंजनाचा आनंद घ्यावा, फिरायला जावे. यासाठी प्राणायाम, ध्यान धारणा देखील करू शकता.
(8) स्वच्छतेची काळजी घ्यावी
अस्वच्छतेमुळे विविध आजार होत असतात. त्यामुळे प्रत्येकाने वैयक्तिक तसेच परिसराच्या स्वच्छतेची देखील काळजी घेतली पाहिजे. यासाठी नियमित दात घासणे, बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुणे, दररोज अंघोळ कारणे अशा वैयक्तिक स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावून घ्या. ज्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.