Benefits of Pani Puri
Benefits of Pani Puri Team Lokshahi

Benefits of Pani Puri : वेटलॉस करायचाय तर पाणीपुरी खा

जेव्हा कधी तुम्हाला चमचमीत खावेसे वाटते तेव्हा पहिले नाव येते ते म्हणजे पाणी पुरीचे.
Published by :
shamal ghanekar
Published on

जेव्हा कधी तुम्हाला चमचमीत खावेसे वाटते तेव्हा पहिले नाव येते ते म्हणजे पाणी पुरीचे (Pani Puri). अनेक लोक पाणीपुरी हेल्दी नसल्याने ती खाण्याचे शक्यतो टाळतात. पण मात्र ते पूर्णतः चुकीचे आहे. पाणीपुरी खाल्याने आपला शरीराला बराच फायदे होतात. पाणीपुरीचा उपयोग वजन कमी करण्यासाठीही होऊ शकतो. अनेकजण पाणीपुरी हेल्दी नसल्याने ती खाण्याचे टाळतात. आपल्याला घरी हवी तशी पाणीपुरी बनवून आपण खाऊ शकतो. त्यामुळे तुमच्या आरोग्याला फायदाच होणार आहे. आरोग्याच्या अनेक समस्यांवर पाणीपुरी रामबाण उपाय ठरते. चला लर पाहूया काय आहेत पाणीपुरी खाण्याचे फायदे.

Benefits of Pani Puri
चहा पिल्याने खरंच वजन वाढते का? वाचा काय आहे सत्य

पाणीपुरी खाण्याचे फायदे

आंबट आणि तिखट मसाल्यांचा पाणीपुरीचे पाणी तयार करण्यासाठी वापर करतात. जर तुम्हाला तोड आले असेल तर त्यावरही तुम्हाला गुणकारी ठरू शकते.

जर तुम्हाला मळमळ, चिडचिड, मूडस्विंग अशा समस्यांना होत असल्याने कोणतीही गोष्ट खाण्याची इच्छा होत नाही आणि अशावेळी पाणीपुरीची खूप मदत होते.

पाणीपुरीचे पाणी बनवण्यासाठी वापरले जाणाऱ्या साहित्यमध्ये वाटलेले जिरे, काळे मीठ आणि पुदिन्याचा यांचा समावेश असतो. त्यामुळे आपले पोट साफ राहते आणि अॅसिडिटी समस्याही दूर होण्यास मदत होते.

पाणीपुरीचे पाणी बनवण्यासाठी त्यामध्ये वापरले जाणारे मसाले तुमची पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. पाणी बनवताना त्यात मिरची, लिंबू, हिंग आणि कच्चा आंबा या गोष्टींचा यामध्ये समावेश करा ज्यामुळे तुमचे वजन कमी करण्यासाठी मदत होईल.

Benefits of Pani Puri
Dark Chocolate for Skin : त्वचेसाठी डार्क चॉकलेट फायदेशीर; जाणून घ्या सविस्तर...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com