Copper Water : तांब्याच्या भांड्यातले पाणी पिल्याने आरोग्याला होतात 'हे' फायदे
तांबाच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्याचे अनेक आरोग्यादायी फायदे आहे. आपल्याकडं पूर्वीपासून तांब्याच्या भांड्यांना (copper pot) खूप महत्व दिलं जात आहे. अनेक घरांमध्ये लोक तांब्याच्या भांड्यातून पाणी पितात. तांब्याच्या भांड्यातले पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत आणि त्यांचा आपल्या आरोग्याला नेमका काय फायदा होतो याबद्दल तुम्हाला माहित आहेत का? तर चला जाणून घेऊया.
तांब्याच्या भांड्यातले पाणी पिण्याचे फायदे :
उन्हाळ्यात तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळं आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. त्यामुळे पचनशक्ती चांगली होते.
तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी पिल्याने जुलाब, कावीळ यांसारखे अनेक आजार पसरवणाऱ्या जिवाणूंना नष्ट करतं.
दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे पोटदुखी, गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यापासून आराम मिळतो.
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे तारुण्यापीटिका तसेच त्वचेसंदर्भातील रोग होत नाहीत. तसेच त्वचा साफ आणि चमकदार होते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी पचनक्रिया सुधारते आणि पचनशक्ती वाढवते. तसेच तांब्याच्या भांड्यामध्ये रात्री पाणी ठेवून ते सकाळी प्यायल्याने पाचनक्रिया सुधारते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी हृदय निरोगी बनवून ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर ठरते. याशिवाय वात, पित्त आणि कफच्या तक्रारी दूर करण्यातही मदत करते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे वाढलेली चरबी कमी होते आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.