कैसांच्या समस्या असणं ही एक नैसर्गिक बाब आहे. आपण वेळोवेळी केसांची (Hair) काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुमचे केस गळतात ? तुमच्या केसांमध्ये कोंडा जास्त प्रमाणात आहे ? तर काळजी करण्याचे काहीही कारण नाही यावर आम्ही घरगुती उपाय म्हणून काही गोष्टी आपणास सांगणार आहोत.
केसांमध्ये कोंडा असणे किंवा केस गळतीचे प्रमाण वाढणे अशा काही समस्या तुम्हाला भेडसावत असतील. आपल्या दैनंदिन जीवनात अधिक ताण तणाव असल्या कारणाने देखील केस गळतात. आपण अंघोळ करताना जे पाणी वापरतो त्या पाण्यातील क्षार हे केसांना अधिक मारक ठरतात. यामुळे केसांमध्ये कमकुवतपणा निर्माण व्हायला लागतो आणि केस गळायला सुरुवात होते.
शिकाकाई पावडर आणि लिंबू (Lemon) यांचे मिश्रण करून दररोज अंघोळीदरम्यान केसांना लावावे. यामुळे आपल्या केसातील कोंडा कमी व्हायला सुरुवात होते आणि हळूहळू काही दिवसांमध्ये केस गळतीचे प्रमाण देखील कमी व्हायला लागेल.