Dahi Handi Wishes 2023: दहीहंडीला 'द्या' या विशेष शुभेच्छा
Dahi Handi Wishes 2023: दहीहंडी हा सण कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्याच दिवशी साजरा केला जातो. दहीहंडी दिवशी उंचीवर दोरीच्या साहाय्याने दही पोहे भरलेली आणि फुलांच्या माळांनी सजविलेली हंडी टांगली जाते आणि गोविदांची पथके एकावर एक थर रचून ही हंडी फोडतात.सार्वजनिक दहीहंडीच्या कार्यक्रमात हजारो-लाखो रुपयांची बक्षिसे ठेवली जातात. परंतु तुम्ही तुमच्या प्रियजनांना सोशल मीडियावर दहीहंडी शुभेच्छा मराठी देऊ शकता.
हे आला रे आला गोविंदा आला…
गवळ्यांच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा…
दहीहंडीच्या शुभेच्छा
तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा,
यशोदेच्या तान्ह्या बाळा
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!
कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दंग,
मात्र अतिउत्साहात नका करू नियमभंग..
सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…!!
दह्यात साखर, साखरेत भात
दहीहंडी उभी करुन देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावून उंच थर,
जोशात साजरा करुया दहीहंडीचा हा सण,
दहीहंडीच्या शुभेच्छा!
विसरुनी सारे मतभेद
लोभ- अहंकार सोडा रे
सर्वधर्मसमभाव जागवून
आपुलकीची दहीहंडी फोडा रे,
दहीहंडीच्या शुभेच्छा!