आले सुद्धा केसांना बनवू शकते मजबूत, जाणून घ्या ते कसे वापरावे
इतरांचे सुंदर आणि निरोगी केस पाहिल्यानंतर बहुतेकांना असे वाटते की आपल्यासारखे केस का नाहीत. केसांची योग्य काळजी न घेतल्याने किंवा पुरेसे पोषक न मिळाल्याने असे घडते. जर तुम्हालाही तुमचे केस निरोगी ठेवायचे असतील तर केसांची काळजी घेण्यासाठी त्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे, ज्यामुळे केसांचे पोषण तर होतेच पण ते केमिकल फ्री देखील राहतात. असेच एक सुपरफूड म्हणजे आले. होय, आले तुमचे केस मजबूत करण्यास देखील मदत करू शकते. केसांसाठी आल्याचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊया.
केस गळणे थांबवू शकते
झिंक आणि मॅग्नेशियमसारख्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात. आल्यामध्ये झिंक आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळतात आणि शरीरातील हे दोन्ही पोषक तत्व आल्याच्या सेवनाने भरून काढता येतात.
कोंडा कमी करते
कोंडा दूर करण्यासाठी आल्याचा फायदेशीर प्रभाव दिसून येतो. आल्यामध्ये झिंक आढळते आणि झिंक युक्त शॅम्पू वापरून कोंड्याची समस्या दूर केली जाऊ शकते.
केसांच्या आरोग्यासाठी
आल्यामध्ये सिलिकॉन नावाचे सेंद्रिय संयुग आढळते. वैज्ञानिक अभ्यासानुसार, सिलिकॉन केस निरोगी ठेवण्यास मदत करू शकते.