eyelids tips: पापण्या दाट आणि सुंदर दिसण्यासाठी ट्राय करा 'हे' घरगुती उपाय...
चेहऱ्यावरील सौंदर्य टिकून राहण्यासाठी आपण माहित असलेले प्रत्येक घरगुती उपाय करून पाहतो. अनेक केमिकल्सयुक्त प्रोडक्ट्सचा देखील वापर करतो. आपल्या सौंदर्यात डोळ्यांचे महत्तवाचे योगदान आहे. डोळे जितके सुंदर आणि मोहक असतील आपण तितकेच सुंदर दिसतो. तसेच चेहऱ्याच्या सौंदर्यामध्ये आणखी एका गोष्टीचा महत्त्वाचा समावेश आहे, ते म्हणजे आपल्या पापण्या. पापण्या दाट आणि सुंदर असतील तर चेहऱ्यावरील सौंदर्य आणखी खुलून येते. पण काही लोकांच्या पापण्या पातळ असतात ज्यामुळे त्यांना खोट्या पापण्यांचा सहारा घ्यावा लागतो. तुमच्या पापण्या दाट आणि सुंदर दिसण्यासाठी या टिप्स नक्की फॉलो करा.
ऑलिव्ह तेल हे केसांची वाढ वाढण्यास मदत करते. ऑलिव्ह तेल पापण्यांना लावल्यास पापण्या दाट होण्यास मदत होईल. तसेच पेट्रोलियम जेल लावल्याने मृत पेशी निघून जातात आणि पापण्या जाड होतात. पेट्रोलियम जेल आणि ऑलिव्ह तेलाने पापण्यांवर मसाज करावा. पण पेट्रोलियम जेल आणि ऑलिव्ह तेल एकत्र डोळ्यांना लावू नका.
खोबरेल तेल हे देखील केसांना लावले जाते जेणेकरून केस घनदाट होण्यास मदत होईल. खाबरेल तेल हे नारळापासून तयार केले जाते आणि नारळ हे केस आणि त्वचेच्या समस्येवर रामबाण उपाय आहे. नारळाच्या तेलामध्ये फॅटी ऍसिड असते ज्यामुळे केसांची ग्रोथ वाढते त्यामुळे पापण्यांना खोबरेल तेल लावण फायद्याचं ठरेल. तसेच बदाम तेलात व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळून ते मिश्रण पापण्यांना लावल्याने पापण्या काळेभूर होण्यास मदत होईल.