Dates Benefits : खजूर खाण्याचे आरोग्यासाठी आहे फायदेशीर
खजूर (Dates) जेवढे खायला चविष्ट आहेत तेवढे ते आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. कारण त्यामध्ये जास्त प्रमाणात पोषक घटक असतात. खजुरामध्ये जीवनसत्त्वे असतात. खजूरमध्ये मनुकाइतक्या कॅलरीज असतात. खजूरमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, मँगनीज, व्हिटॅमिन बी जास्त प्रमाणात असतात. खजूरमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात ते आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर फळ आहे. खजूर खल्याने वजनही कमी होण्यास मदत होते.
नियमित एक खजूर खाल्याने आपल्या शरीराला शक्ती मिळते. व्हिटॅमिन सी (vitamin) खजुरात असते ज्यामुळे शरीराला ताकद मिळते आणि आपला थकवाही दूर होण्यास मदत मिळते. तसेच लहान मुलांसाठी खजूर हे अत्यंत पौष्टिक असते.
अनेकांच्या शरीराला रक्ताची कमतरता जाणवते त्यामुळे आजाराच्या समस्याही निर्माण होतात. यावर खजूर हे गुणकारी आहे. खजुरामध्ये आयरनचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.येवढेच नाही तर महिलांसाठी खजूर खाणे खूप महत्त्वाचे आहे.
खजुरामध्ये पोटॅशियम आणि सोडियम हे पोषक घटक असतात. जे आपल्या मेंदूचा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. तसेच लहान मुलांना रोज एक खजूर दिल्याने त्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत होते.
खजूरामध्ये मॅंगनीज, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असे अनेक पोषक घटक आहेत. खजूर हे मधमेहींसाठी पौष्टिक असते.
रोज रात्री एक खजूर पाण्यात भिजवून खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि पोटाचे उद्भवणाऱ्या समस्याही कमी होतात. त्यामुळे रोज रात्री खजूर खाणे शरीराला चांगले आणि खूप फायदेशीर असते.