healthy food
healthy foodTeam Lokshahi

रोज सकाळी हे पदार्थ खा; कसलाही त्रास होणार नाही...

दररोज सकाळी हे आहार घ्या
Published by :
Saurabh Gondhali
Published on

मेथ्या

मेथ्यांमध्ये (Methya) भरपूर प्रमाणात फायबर असतं. आतड्यांची स्वच्छता करण्यासाठी हे फायबर महत्वाचे असतात. बध्दकोष्ठतेच्या (Constipation) समस्येने ग्रस्त लोकांसाठी मेथ्या भिजवून खाणं फायदेशीर आहेत. एक चमचा मेथ्या रात्रभर भिजवून सकाळी खाल्ल्यास पचन व्यवस्था नीट काम करते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी, पाळीतील वेदना कमी करण्यासाठी मेथ्यांचं सेवन फायदेशीर ठरतं. 

खसखस

चयापचय क्रिया सुधारण्यासाठी खसखस (Poppy) फायदेशीर ठरते. रात्रभर खसखस भिजवून सकाळी खाल्ल्यास शरीरात चरबी जमा होत नाही. स्थूलपणा कमी होतो. लठ्ठपणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची तीव्रता कमी होते. 

जवस

जवसामध्ये ओमेगा 3 हे फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतं. एक चमचा जवस (Linseed) पाण्यामध्ये रात्रभर भिजवून सकाळी खाल्यास हाय कोलेस्ट्रॉल (Cholesterol) कमी होते. रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी भिजवलेले जवस फायदेशीर असतात. जवसामध्ये आहारीय तंतूमय घटकाचं प्रमाण जास्त असल्यानं भिजवलेले जवस खाल्ल्याने पचनव्यव्स्थेचं काम सुधारतं. 

मनुके

मनुक्यांमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोह हे घटक असतात. रोज रात्री मनुका (Raisins) भिजवून सकाळी खाल्ल्यास वजन नियंत्रित ठेवण्यासोबतच शरीरातील कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखता येते. भिजवलेले मनुके खाल्ल्याने त्वचा निरोगी राहाते. ॲनेमियासारख्या समस्यांच धोका टळतो.

हिरवे मूग

भिजवलेल्या हिरव्या मुगामध्ये प्रथिनं, फायबर आणि ब जीवनसत्व असतं. भिजवलेले हिरवे मूग (Green mung bean) खाल्ल्यानं बध्दकोष्ठतेची समस्या दूर होते. भिजवलेल्या हिरव्या मुगामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम यांचं प्रमाण भरपूर असल्यानं रक्तदाब असलेल्या रुग्णांनी हिरवे मूग रात्री भिजवून सकाळी अवश्य खावेत. हिरव्या मुगात ॲण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण जास्त असल्यानं शरीराचं फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होतं. मधुमेह, कर्करोग, जुनाट आजारांचा धोका कमी होतो. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com