कानाची मालिश करण्याचे आहेत असंख्य फायदे; जाणून घ्या
Ear massage : जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक कायम ठेवायची असेल तर तुमचे कान यामध्ये मदत करू शकतात. जर तुम्ही विचार करत असाल की कान आणि चेहऱ्याच्या ग्लोचा काय संबंध आहे, तर तुम्हाला सांगतो की कानांना मसाज केल्याने चेहरा देखील ताणला जातो, ज्यामुळे त्वचा घट्ट होते आणि त्याची चमक कायम राहते. कसा करावा हा कानाचा मसाज जाणून घ्या.
कानांची मालिश कशी करावी?
- सर्वप्रथम आपले कान दोन बोटांच्या मध्ये ठेवा आणि नंतर ते चोळा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारेल. याशिवाय कान दुमडावेत. हा व्यायाम 5 ते 10 मिनिटे करा.
- यानंतर बोटांनी कानामागे मसाज करा. ही पद्धत तुमच्या चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी देखील काम करेल. त्यामुळे तुम्ही आतापासून या तीन कान मसाज थेरपी करायला सुरुवात केली तर तुमच्या चेहऱ्याची चमक झपाट्याने सुधारेल.
- याशिवाय रोज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्याला एलोवेरा जेलने मसाज करा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमकही येईल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ऑलिव्ह ऑईलनेही चेहऱ्याची मालिश करू शकता. हे तेल तुमची त्वचाही घट्ट ठेवेल.
- त्याचबरोबर खोबरेल तेलात जेल मिक्स करून चेहऱ्याचा मसाजही करू शकता. अशा प्रकारे चेहऱ्याचा मसाज केल्याने चेहऱ्याची चमक कायम राहते. यामुळे तुमचा चेहरा घट्ट राहतो.