चहा पिल्याने खरंच वजन वाढते का? वाचा काय आहे सत्य
देशातच नव्हेतर जगभरात चहाप्रेमी आपल्याला पाहायला मिळतात. अनेकांचा तर चहा घेतल्याशिवाय दिवसही सुरु होत नाही. सकाळापासून सुरु झालेला चहाचा कप दिवसभर सुरुच असतो. परंतु, वजन कमी करायचे असल्यास चहा शौकीन पहिला चहाच सोडतात. त्यांना चहा सोडायचे सल्लेही दिले जातात. केवळ वजनच नाहीतर कोणताही आजार शुगर, अॅसिडीटीमध्येही चहा सोडण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, खरचं चहा पिल्याने वजन वाढते का, याचीच सत्यता आम्ही सांगणार आहोत.
तुम्ही चहा कशा पध्दतीने पिता यावर निर्भर आहे की चहाने वजन वाढते की नाही. बऱ्याचदा लोक चहा बनवताना अधिक साखर आणि दूध टाकतात. यामुळे वजन वाढण्याची शक्यता आहे. जर तुम्ही दिवसांतून 3-4 वेळा चहा पित असाल तर शरीरात साखरेची मात्रा वाढते. तसेच, फुल फॅट दूधासह चहा पित असाल तर वजन वाढण्याचीही शक्यता आहे.
चहा पिताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात
चहा न सोडताही फिट राहायचे असेल तर साखरेचा वापर करु नका. गोडव्यासाठी दुसरे पर्याय शोधा. आर्टिफिशियल साखरेचा कमीत कमी उपयोग करा. गुळ आणि मधानेही चहा गोड होऊ शकतो.
जर तुम्ही दुधाच्या चहाऐवजी काळा चहा (Black Tea) पिल्यास आरोग्यासाठी कधीही उत्तम ठरतो. असे करु शकत नसाल तर कमीत कमी फॅटचे दूध वापरा. अनेक वेळा दुधाला पर्याय म्हणून मिल्क पावडरचा वापर करण्यात येतो. पण, ही चूक करु नका.