उन्हाळ्यात भूक लागत नाहीय? हे 5 घरगुती उपाय भूक वाढवतील
वेलची(Cardamom) खाल्ल्याने वास आणि चव वाढते. त्याचा वापर केल्यानं स्वादिष्ट पदार्थांचा वास नाकात येताच तुम्हाला भूक लागण्यास सुरुवात होते आणि तुम्ही अन्नाचा आस्वाद पूर्णपणे घेऊ शकता. याशिवाय वेलची खाल्ल्याने पोटात बद्धकोष्ठता आणि पचनाचा त्रास होत नाही.
उन्हाळ्यात अनेकदा अन्न पचायला त्रास होतो, त्यामुळे भूक लागत नाही. अशा परिस्थितीत बडीशेप(Fennel) खाणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. बडीशेप खाल्ल्याने अन्न सहज पचते आणि पोटही स्वच्छ राहते.
उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी अनेकजण दही(Curd) खातात. दह्याचे प्रोबायोटिक्स गुणधर्म पचनसंस्थेला निरोगी ठेवून पोटाच्या सर्व समस्या दूर करण्यात मदत करतात, त्यामुळे तुम्ही दह्याचे सेवन करू शकता त्यामुळे भूकही लागते.
भूक वाढवण्यासाठी तुम्ही धन्यांचा(Coriander) उपयोग करू शकता. धने थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवा आणि हे पाणी अधुनमधून पित राहा. तुमची भूक वाढवण्यासोबतच धने शरीराला आतून थंड ठेवण्यासही उपयुक्त ठरतील.
भूक न लागल्यामुळे तुम्हाला पोटाचा त्रास होत असेल, तर ओवा(Ajwain) खाणं प्रभावी ठरेल. ओवा खाल्ल्याने पोटदुखी, गॅस आणि पचनाच्या समस्या कमी होतातच त्यासोबत आपल्याला चांगली भूकही लागते.