लाकडी कंगवा वापरायचे फायदे माहीत आहेत का?
केस विंचरण्यासाठी लाकडी कंगव्याचा वापर केल्याने केसांना फायदा होतो. लाकडी कंगव्याने केस विंचरताना जास्त गुंता होत नाही अथवा गुंता पटकन सोडवण्यास मदत होते. लाकडी कंगवा हा लाकडासारख्या नैसर्गिक घटकांपासून तयार केलेला असतो. केसांची योग्य निगा राखण्यासाठी जास्तीत जास्त नैसर्गिक प्रसाधने आणि साधनांचा वापर करायला हवा.
लाकडी कंगवा त्वचेला स्क्रॅच किंवा इजा न करता स्काल्पची मालिश करतो. त्यामुळे डोक्यातील ब्लड सर्कुलेशन चांगले राहून मन शांत राहते.केसांच्या मुळांना मसाज होते आणि त्यामुळे केस दाट आणि मजबूत होतात. तर प्लॅस्टिकच्या कंगव्यामुळे स्ट्रोकच्या शेवटी गुंता तयार होतो
डोक्यातील कोंडा फक्त केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचवण्यापासून रोखत नाही तर त्यांना कमकुवत देखील बनवतो. पण लाकडी कंगव्याचे मऊ, गोलाकार दात स्काल्पला आराम देतात प्लॅस्टिकच्या कंगव्यामध्ये आधीच घाण साचलेली असते, ज्यामुळे केसांमध्ये इन्फेक्शन होऊ शकते.