Heat Wave
Heat WaveTeam Lokshahi

उन्हाळयात थंड पाणी पित आहात? होऊ शकतात ‘हे’ आजार जाणून घ्या

उन्हाळा वाढला की सर्वांनाच थंड काहीतरी खावेसे वाटते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

उन्हाळा वाढला की सर्वांनाच थंड काहीतरी खावेसे वाटते. सतत थंड पाणी प्यावेसे वाटते. मात्र हे थंड पाणी आरोग्याला नुकसान पोहचवू शकते. जर तुम्हाला थंडच पाणी प्यायचे असेल तर मडक्यातले पाणी प्या. असे सांगितले जाते.

चला तर मग जाणून घेऊया थंड पाणी प्यायल्याने कोणते दुष्यपरिणाम होतात. थंड पाणी प्यायल्याने तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होतो. जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा थंड पाण्याने धुता तेव्हा तुमची त्वचा घट्ट होते.

थंड पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता देखील होते. अन्न पचणे कठीण होते. थंड पाणी प्यायल्यानंतर अनेकांना डोकेदुखीची तक्रार सुरू होते. तसेच जेव्हा बर्फ गिळताना अनेकांच्या कपाळावर वेदना होतात

थंड पाणी पिणे देखील हृदयासाठी चांगले नाही. त्यामुळे थंड पाण्याचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com