Beautiful Look In Winter: हिवाळ्यात हात-पाय सुंदर दिसण्यासाठी करा "हा" घरगुती उपाय.
आपले हात-पाय सुंदर आणि स्वच्छ असावेत असं प्रत्येकाला वाटत असतं. यातही महिलांना आपल्या त्वचेबद्दल जास्त काळजी असते. अशातच आता थंडी सुरू झालीये. थंडीच्या दिवसात आपली त्वचा जास्त काळी पडल्याचं पहायलं मिळतं. हाताचे कोपरे, गुडघा. टाचा या दिवसात जास्त काळ्या दिसतात आणि यासोबतच त्वचा रुक्षदेखील होते.
यामुळे आपण याला टॅनिंग समजून ब्युटी पार्लरमध्ये धाव घेतो आणि वाटेल तेवढे पैसे खर्च करतो. पण आता ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची आणि भरमसाठ पैसे खर्च करण्याची गरज नाहीये. कारण तुम्ही यासाठी आता घरगुती उपाय करू शकणार आहात.
टॅनिंग कमी करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल आणि कॉफीचा वापर करु शकता. खोबरेल तेलाचा वापर जसा केस सुंदर दिसण्यासाठी केला जातो तितकंच त्वचेसाठी देखील खोबरेल तेल फायदेशीर आहे. तर कॉफीचा उपयोग स्कीन ब्राईटनिंगसाठी केला जातो.
खोबरेल तेल आणि कॉफीचा उपाय
कॉफीमध्ये असणारे अॅंटीऑक्सिडंट्स त्वचेवरील मृत पेशी म्हणजेच Dead Cells काढून टाकण्यास मदत करतात. ज्यामुळे त्वचा चमकदार दिसण्यास मदत होते.
तर खोबरेल तेलामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. यामुळे त्वचा मुलायम आणि तजेलदार राहते. या दोन गोष्टींचा वापर करून तुम्ही स्क्रबही तयार करु शकता.
स्क्रब तयार करण्याची कृती
हा स्क्रब तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये 2 चमचे कॉफी पावडर घ्यावी. यात 1 चमचा खोबरेल तेल मिक्स करून पेस्ट तयार करा. ही तयार केलेली पेस्ट हाता-पायांना लावा. नंतर 10-15 मिनिटे हाता-पायांना मसाज करा. काही वेळाने स्क्रब केल्यानंतर हात-पाय स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. तुम्हाला पहिल्या वॉशमध्येच फरक पहायला मिळेल.