वाढत्या थंडीमुळे कोंड्याची समस्या? 'या' सोप्या टिप्सने होईल दूर

वाढत्या थंडीमुळे कोंड्याची समस्या? 'या' सोप्या टिप्सने होईल दूर

हिवाळ्याच्या कोरड्या आणि थंड वाऱ्यामुळे टाळूची आर्द्रता कमी होते, त्यामुळे केसांमध्ये कोंड्याची समस्या वाढते. अशा परिस्थितीत काळजी करण्याची गरज नाही.
Published on

Hair Care Tips : आपल्या सर्वांना माहित आहे की, थंडीच्या काळात आपल्या केसांची सर्वात मोठी समस्या कोंडा ही असते. हिवाळ्याच्या कोरड्या आणि थंड वाऱ्यामुळे टाळूची आर्द्रता कमी होते, त्यामुळे केसांमध्ये कोंड्याची समस्या वाढते. याशिवाय हिवाळ्यात गरम पाण्याने केस धुण्याची सवय देखील डोक्यातील कोंडा वाढवते कारण गरम पाण्याने टाळूतील ओलावा आणि तेल निघून जाते. अशा परिस्थितीत केसांची चमक कमी होते आणि केस गळण्याचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला असेच काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

वाढत्या थंडीमुळे कोंड्याची समस्या? 'या' सोप्या टिप्सने होईल दूर
घामाच्या वासाने तुम्हीही हैराण आहात का? 'या' टिप्स वापरा, परफ्युमची गरजच पडणार नाही!

लिंबाचा रस

लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे कोंडा दूर करण्यास मदत करते. लिंबाचा रस आठवड्यातून 2-3 वेळा लावा. तुम्ही लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून लावू शकता. ते केसांना लावल्याने केसांना हायड्रेट ठेवते आणि कोंडा टाळतो. कोंडा दूर करण्यासाठी हा एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे.

कोरफड

कोरफडीमध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात ज्यामुळे कोंडा दूर होतो. यामध्ये अँटी-फंगल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म कोंडा होण्यास प्रतिबंध करतात. कोरफडमध्ये असलेले एन्झाइम त्वचेच्या मृत पेशी काढून टाकतात ज्यामुळे कोंडा होतो. हे केस आणि टाळू हायड्रेटेड ठेवून कोंडा प्रतिबंधित करते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोरफडीचा वापर केल्यास केसांमधून कोंडा हळूहळू नाहीसा होईल आणि केस चमकदार आणि निरोगी होतील. केसांवर कोरफडीचे जेल लावल्याने कोंडा दूर होतो

खोबरेल तेल

खोबरेल तेलामध्ये अँटी-फंगल गुणधर्म आढळतात, ज्यामुळे कोंडा होणाऱ्या बुरशीला प्रतिबंध होतो. यामुळे कोंड्याची समस्या दूर होते. हे केसांना नैसर्गिक आर्द्रता प्रदान करते, ज्यामुळे केस कोरडे आणि खडबडीत राहत नाहीत. ओलावा डोक्यातील कोंडा दूर करतो.त्यामध्ये व्हिटॅमिन ई आणि के असतात जे केसांची मुळे मजबूत करतात आणि केस गळणे थांबवतात. त्यामुळे आठवड्यातून दोन ते तीन वेळा खोबरेल तेल लावल्याने केसांमधील कोंडा दूर होईल आणि केस मजबूत आणि निरोगी होतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com