Corona Vaccine for Animals
Corona Vaccine for Animalsteam lokshahi

Anocovax: पाळीव प्राण्यांसाठी कोरोनाची पहिली लस लॉन्च, जाणून घ्या खासियत

तुमच्या पाळीव प्राण्यांना लसीची गरज आहे का?
Published by :
Shubham Tate
Published on

Corona Vaccine for Animals : आता भारतात प्राण्यांसाठी कोरोनाची लस आली आहे. ही लस पूर्णपणे स्वदेशी आहे, जी हरियाणास्थित ICAR-National Research Centre on Equines (NRC) ने बनवली आहे. या लसीचे नाव अॅनोकोव्हॅक्स आहे. या लसीची खास गोष्ट म्हणजे ती कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉनवरही प्रभावी आहे. लसीसोबतच प्राण्यांसाठी अँटीबॉडी शोधण्याचे किटही सुरू करण्यात आले आहे. (coronavirus india icar launched anocovax covid vaccine for animals)

ICAR चा दावा आहे की, एनोकॉव्हॅक्सने प्राण्यांमध्ये कोरोनाविरूद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी प्रभावी सिद्ध केले आहे. या लसीमध्ये कोरोनाचे डेल्टा अँटीजेन आणि अॅलहायड्रोजेल आहे. विशेष म्हणजे ही लस कुत्रे, सिंह, चित्ता, उंदीर आणि ससे यांच्यावर प्रभावी आहे.

या लसीसोबतच प्राण्यांमधील कोरोना विरूद्ध अँटीबॉडीज शोधण्यासाठी डिटेक्शन किट देखील लाँच करण्यात आली आहे. CAN-CoV-2 ELISA नावाने लाँच केलेले हे किट भारतातही बनवले गेले आहे.

Corona Vaccine for Animals
Men Health Tips : वयाच्या 30 वर्षानंतर प्रत्येक पुरुषाने करून घ्याव्यात 'ह्या' चाचण्या, म्हणजे येणार नाही अडचण

प्राण्यांना लसीची गरज का ?

फेब्रुवारी 2020 मध्ये हाँगकाँगमध्ये एक कुत्रा कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. प्राण्यामध्ये कोरोनाची ही पहिलीच घटना होती. जानेवारी 2020 मध्ये सॅन दिएगो येथील सफारी पार्कमध्ये 8 गोरिल्ला कोरोना संक्रमित आढळले.

नोव्हेंबर २०२१ मध्ये अमेरिकेतील नेब्रास्का येथील प्राणीसंग्रहालयात तीन हिम बिबट्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत जगभरात सिंह, वाघ, हिम बिबट्या, कुत्रे आणि पाळीव मांजरांमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळून आला आहे.

भारताबद्दल बोलायचे तर, गेल्या वर्षी मे महिन्यात हैदराबादमधील प्राणीसंग्रहालयात 8 आशियाई सिंहांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले होते. गुजरातमध्येही कुत्रे, गायी आणि म्हशींमध्येही कोरोनाचा संसर्ग आढळून आला आहे. जूनमध्ये चेन्नईतील प्राणीसंग्रहालयात संसर्गामुळे दोन सिंहांचा मृत्यू झाला होता.

यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा संसर्ग माणसांपासून प्राण्यांमध्ये पसरू शकतो, परंतु प्राण्यांपासून मानवांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही.

इतर देशांमध्ये प्राण्यांसाठी कोरोनाची लस आहे का?

एप्रिल 2021 मध्ये रशियाने प्राण्यांसाठी पहिली कोरोना लस बनवल्याचा दावा केला होता. या लसीला Carnivac-Cov असे नाव देण्यात आले आहे. ही लस कुत्रे, मांजर, कोल्हे यांच्यावर प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

हाँगकाँगमध्ये कुत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्यानंतर यूएसस्थित फार्मा कंपनी झोएटिसनेही प्राण्यांसाठी कोरोनाची लस बनवण्याचे काम सुरू केले. ऑगस्ट 2021 मध्ये, ऑकलंडमधील प्राणीसंग्रहालयातील 48 प्राण्यांना ही लस चाचणी म्हणून दिली गेली. डिसेंबर 2021 मध्ये देखील सॅन दिएगो येथील प्राणीसंग्रहालयात ही लस 260 प्राण्यांना देण्यात आली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com