Benefits Of Black Pepper
Benefits Of Black Pepper Team Lokshahi

कफ आणि खोकल्यासाठीच नव्हे तर काळी मिरीचे आहेत अनेक फायदे

जर का आपल्याला कफ आणि खोकल्याच्या समस्या सारख्या जाणवत असतील तर कमीत कमी 4 दिवस काळी मिरीचे सेवन करा. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
Published by :
shamal ghanekar
Published on

काळी मिरीचा (Black Pepper) भारतीय मसाल्यांमध्ये वापर केला जातो. काळी मिरीचा उपयोग औषध आणि मसाला असा दोन्ही करता येतो. काळ्या मिरीमध्ये बऱ्याच प्रकारची विटामिन्सदेखील असतात. काळ्या मिरीमध्ये विटामिन ए, विटामिन सी, विटामिन ई, विटामिन के आणि विटामिन बी हे घटक आहे. काळी मिरी आपल्या आरोग्यासाठीही खूप लाभदायक आहे. तुम्हाला माहित आहे का? काळी मिरी किती गुणकारी आहे. तर आज आपण या लेखामधून हे जाणून घेणार आहोत की काळी मिरीचे आपल्या शरीरला होणारे फायदे.

Benefits Of Black Pepper
लाल की हिरवे कोणते सफरचंद फायदेशीर? जाणून घ्या

काळ्या मिरीचे सेवन केल्याने होतात फायदे

जर का आपल्याला कफ आणि खोकल्याच्या समस्या सारख्या जाणवत असतील तर कमीत कमी 4 दिवस काळी मिरीचे सेवन करा. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

जेवण झाल्यानंतर आपल्याला अपचन गॅस संबंधित समस्या जाणवल्यास जेवणानंतर काळ्या मिरी पूडमध्ये लिंबाचा रस आणि मीठ टाकून ते मिश्रण चोखा त्याचा तुम्हाला फायदाच होईल.

जर तुम्हाला घश्यासंबंधित समस्या जाणवत असतील तर तूप, साखर आणि मिरी पावडर यांचे मिश्रण बनवून चाटल्याने सर्व ठीक होते.

काळ्या मिरीमध्ये पिपेरिनमध्ये अँटी ऑक्सिडंट असते जे आपल्याला जाणवणारा ताणतणाव कमी करण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये काळी मिरीचा समावेश करा ती तुम्हाला फायदेशीर ठरू शकते.

जर तुम्हाला एखाद्या प्रकारची जखम झाली आहे आणि त्या जखमेतून होणारा रक्ताचा स्त्राव थांबत नसेल तर यावर काळी मिरी कुटून लावा ज्यामुळे ती जखम लवकर बरी होण्यासाठी मदत होईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com