आवळा हा रिकाम्या पोटी खल्लाणे अनेक फायदे होतात. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन (Vitamins) सी, कॅल्शिअम, पोटॅशियम सारखे अनेक पोषक घटक आहेत. रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनशक्ती मजबूत करण्यासाठी कच्चा आवळ्याची मदत होते.
कच्चा आवळा हा डोळे आणि केसांसाठी उपयुक्त आहे. आवळा हा तुम्ही रात्री भिजवून आणि उकळूनही खाऊ शकता.
रिकाम्या पोटी आवळ्याचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. याव्यतिरिक्त, आवळा शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. सकाळी रिकाम्या पोटी कच्चा आवळा किंवा त्याचा रस (Juice) बनवून प्यायल्याने अनेक फायदे होतात.
आवळ्यामध्ये खूप प्रमाणात फायबर असल्याने ते शरीराची पचनक्रिया बरी करते. आणि पोटाच्या समस्याही दूर होण्यास मदत होते. रिकाम्या पोटी याचे सेवन केले असता बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीपासून आराम भेटतो.
आवळ्यामध्ये कॅल्शियम (Calcium) खूप प्रमाणात असते. ते खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखीपासूनही थोडा आराम मिळतो. आवळ्यात पोटॅशियमही असते, जे शरीराच्या स्नायूंसाठी मजबूत ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.
करवंदाचा वापर केल्याने केस काळे, दाट ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. आवळ्यामधील असलेले अँटीऑक्सिडंट्स हे तुमच्या त्वचेवरील डागही दूर करतात. किंवा यासाठी आवळ्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर तुम्ही लावू शकता.