Benefits of coriander leaves
Benefits of coriander leavesTeam Lokshahi

Benefits of coriander leaves : कोथींबीर सेवन केल्याने होतात 'हे' फायदे

कोथींबीर असा घटक आहे जी बहुतेक घरात अन्नपदार्थांमध्ये वापरला जाते.
Published by :
shamal ghanekar
Published on

कोथींबीर (coriander leaves) असा घटक आहे जी बहुतेक घरात अन्नपदार्थांमध्ये वापरला जाते. मग भाज्या, डाळ आणि पदार्थाची सजावट करण्यासाठी कोथींबीरचा वापर केला जातो. कोथींबीरचा वापर केल्याने जेवणाची चव आणि जेवणाचा सुगंधही छान येतो. कोथिंबिरीच्या पानांमध्ये असे अनेक एन्झाइम्स आढळतात जे रक्तामधील साखरचे प्रमाण कमी करण्यात मदत करतात.

ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहेत त्यांच्यासाठी ही फायदेशीर औषधी वनस्पती आहे. कोथिंबीरीचा समावेश आपल्या आहारामध्ये केल्याने आपल्याला त्याचे अनेक फायदे होतात. तर चला जाणून घेऊया काय आहेत फायदे.

कोथींबीर खाण्याचे फायदे

कोथिंबिरीच्या पानांमध्ये भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडंट (Antioxidant) असतात, ज्यामुळे पचन होण्यास मदत होते. हिरवी कोथिंबिरी सूज आणि बद्धकोष्ठता दूर ठेवण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.

कोथिंबिरीच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट असतात जे तणाव कमी करण्यासाठी मदत करतात. कोथींबीर ही स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.

Benefits of coriander leaves
Tea Benefits : मसाला चहा पिण्याचे आहेत 'हे' फायदे

कोथिंबिरीच्या पानामध्ये जीवनसत्त्वे आणि प्रथिने व्यतिरिक्त कॅल्शियम (Calcium), लोह आणि मँगनीज जास्त प्रमाणात असतात. रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

कोथिंबीरी रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कोथिंबिरी खाल्ल्याने अनेक एंजाइम सक्रिय होतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत करते.

हिरवी कोथींबीर शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल (Cholesterol) कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत होते.

कोथींबीरीची पाने पाण्यामध्ये उकळून तुम्ही पिऊ शकता, त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल.

Benefits of coriander leaves
Raw Banana Benefits : कच्ची केळी खाण्याचे 'हे' आहेत फायदे
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com