तुम्हीपण या समस्येने त्रस्त आहात का ? मग वाचा सविस्तर...
बऱ्याचवेळा असे घडते की जेव्हा तुम्ही रात्रीचे जेवण करून दुसऱ्या दिवशी सकाळी उठता तेव्हा तुम्हाला तुमचे पोट रिकामे वाटते म्हणजेच तुम्हाला भूक लागते. फक्त तुम्हालाच नव्हे तर बऱ्याच लोकांना असे वाटते की रात्रीचे जेवण करूनही जणू काही खाल्लेच नाही. त्यामुळे दिवसभर थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. जे लोक रात्री जड अन्न खातात त्यांच्या बाबतीत असे घडते कारण त्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर त्यांना भूक लागते. म्हणून आम्ही तुम्हाला याची कारणे सांगू.
अभ्यास काय सांगतो?
एका अभ्यासानुसार रात्रीचे जेवण खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरात भरपूर इन्सुलिन तयार होते. जे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याचे काम करते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी थकवा जाणवतो. याचे कारण असे की तुम्ही रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात सोडियमचे सेवन केले आहे. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता असते आणि जास्त तहान लागने ही देखील एक प्रकारची भूक असते. त्यामुळे सकाळी उठल्यावर सर्वप्रथम दोन ग्लास पाणी प्यावे.
वेळेवर खा
शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना रात्री उशिरा जेवण्याची सवय असते यामुळे त्यांचे पोट खराब होते. तर तुम्ही नेहमी झोपण्याच्या २ तास अगोदर तुमचे अन्न खावे. जेणेकरून तुम्हाला पोटात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही आणि तुमचे अन्न सहज पचते तसेच तुम्हाला सकाळी भूक लागते. त्याचसोबत इतर काही समस्येचा सामनाही करावा लागणार नाही.
खाल्ल्यानंतर चालणे
रात्रीचे जेवण झाल्यावर थोडा वेळ नक्कीच फिरायला जावे. जेणेकरून तुमचे अन्न सहज पचते आणि तुमची पचनक्रियाही मजबूत होते. जे लोक त्यांच्या वाढत्या वजनामुळे त्रस्त आहेत त्यांच्यासाठी अन्न खाल्ल्यानंतर चालणे खूप फायदेशीर ठरू शकते.