दिवाळीत झटपट चमक येण्यासाठी लावा 'हा' फेस पॅक, जाणून घ्या घरी कसा बनवायचा?

दिवाळीत झटपट चमक येण्यासाठी लावा 'हा' फेस पॅक, जाणून घ्या घरी कसा बनवायचा?

दिवाळीचा सणादिनी सर्वच जण सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण दिवाळीच्या काळात घराची साफसफाई आणि तयारी या कामात जास्त मेहनत केल्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य आणि चमक कमी होते.
Published on

Natural Face Pack : दिवाळीचा सणादिनी सर्वच जण सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण दिवाळीच्या काळात घराची साफसफाई आणि तयारी या कामात जास्त मेहनत केल्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य आणि चमक कमी होते. दिवाळीच्या निमित्ताने तुमची त्वचा खास आणि चांगली दिसावी असे वाटत असेल तर काही घरगुती उपाय करून तुम्ही झटपट ग्लो मिळवू शकता. दिवाळीच्या व्यस्ततेतही तुम्ही पार्लमध्ये न जाता तुमच्या चेहऱ्याची चमक कायम ठेवू शकता. या सोप्या आणि नैसर्गिक पद्धतींनी सुंदर चमकदार त्वचेसह दिवाळीचा आनंद घेऊ शकाल. चला जाणून घेऊया फेस पॅक कसा बनवायचा.

दिवाळीत झटपट चमक येण्यासाठी लावा 'हा' फेस पॅक, जाणून घ्या घरी कसा बनवायचा?
फाउंडेशन लावल्यानंतरही परफेक्ट ग्लो मिळत नाही? तर तुम्ही 'ही' चूक करत आहात

लिंबू आणि बेसन फेस पॅक

त्यात एक चमचा बेसन आणि अर्धा लिंबाचा रस मिसळा. ते चांगले मिसळून पेस्ट बनवा. चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटांनी धुवा. लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी असते जे त्वचा खोल स्वच्छ करते आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते. यामुळे त्वचा मुलायम आणि चमकते. लिंबाचा रस त्वचेला घट्ट आणि कडक बनवतो. बेसनामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे मुरुम आणि डागांशी लढतात. यामुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम राहते.

बटाटा आणि मध फेस पॅक

बटाटे मॅश करा आणि मध मिसळा. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे राहू द्या. नंतर थंड पाण्याने धुवा. हे लावल्यानंतर तुमचा चेहरा पूर्णपणे चमकेल.

कॉफी आणि दही फेस पॅक

कॉफी आणि दही फेस पॅक बनवणे खूप सोपे आहे. 2 चमचे कॉफी पावडर घ्या आणि त्यात 1 चमचे दही घाला आणि त्यात थोडा लिंबाचा रस घाला आणि चांगले मिसळा. ते पेस्टसारखे तयार होईल. ही पेस्ट लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा आणि कोरडा करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 10-15 मिनिटे तशीच राहू द्या, नंतर थंड पाण्याने धुवा. या फेस पॅकमुळे त्वचा खोलवर स्वच्छ होईल आणि झटपट चमक येईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com