त्वचेचे टॅनिंग आणि सुरकुत्यांपासून संरक्षण करण्यासाठी चेहऱ्यावर लावा दही-बेसन फेसपॅक
बेसन आणि दही हे चेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवता येते. चेहऱ्यावर फेसपॅक लावण्यासाठी अनेक लोक केमिकल्स असलेले स्किन केअर प्रोडक्ट्स वापरतात. यामुळे चेहऱ्यावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. हे सगळं रोखण्यासाठी चेहऱ्यावर लावा दही आणि बेसनापासून तयार केलेला फेसपॅक.बेसन आणि दही चेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या समस्या तर दूर होतातच पण या मिश्रणाने तुम्हाला स्वच्छ आणि चमकदार त्वचा मिळण्यास मदत होते.
चेहऱ्यावरील मुरुम आणि डाग कमी करण्यास मदत करते:
दह्यामध्ये व्हिटॅमिन सी, लॅक्टिक ॲसिड आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म यांचा समावेश असतो. जो चेहऱ्यावरील मुरुम कमी करण्यास मदत करतो. बेसन त्वचेतील तेल काढून टाकण्यास मदतो. यामुळे त्वचा मुलायम बनवते.
चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि टॅनिंग निघून जाण्यास मदत करते:
बेसन आणि दही लावल्याने त्वचेवर असलेले हानिकारक बॅक्टेरिया साफ होतात. बेसन आणि दही त्वचा घट्ट होण्यास मदत करते. तसेच दही आणि बेसन सनबर्न काढण्यासाठी जाणले जाते. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि टॅनिंगपासून आराम मिळतो.
त्वचा मुलायम राहण्यास मदत करते:
त्वचेवर पुरळ उठणे, त्वचेवर जळजळ होणे, त्वचा कोरडी होणे या समस्या दूर करण्यासाठी दही-बेसन फेसपॅक परिपूर्ण उपाय आहे. बेसन मृत त्वचेच्या पेशी काढून त्वचा मुलायम करते. तसेच त्वचेची लवचिकता टिकवून ठेवते.