आहारात नियमित मुगडाळ खाण्याचे काय आहेत फायदे ?
१. ही डाळ अगदी हलकी, पथ्याची डाळ आहे. लहान मुलांना किंवा वयस्कर व्यक्तींना आवर्जून ही डाळ दिली जाते.
२. प्रथीने शरीरात शोषले जाण्यासाठीचे घटक या डाळीत चांगल्या प्रमाणात आहेत. त्यामुळे शरीरातील प्रथिनांचे प्रमाण चांगले राहण्यास या डाळीचा उपयोग होतो.
३. सध्या कोलेस्टेरॉलची समस्या अतिशय सामान्य झाली आहे. मूगाच्या डाळीतील विरघळण्याजोगे तंतुमय पदार्थ (सोल्युबल फायबर्स) शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठी मदत करतात.
४. मूगडाळीतला ‘आयसोफ्लॅवॉन’ हा घटक ‘इस्ट्रोजेन’ या संप्रेरकासारखा परिणाम देतो. त्यामुळे स्त्रियांना रजोनिवृत्तीनंतर शरीरातील इस्ट्रोजेन कमी झाल्यामुळे होणाऱ्या त्रासाच्या वेळी मूगडाळ चांगली ठरते.
५. मूगाच्या डाळीत ‘बी- १२’ सोडून इतर सर्व ‘बी’ जीवनसत्त्वे असतात. ‘सी’ जीवनसत्त्व आणि फॉलिक अॅसिडही यात असल्यामुळे ही डाळ प्रतिकारशक्तीसाठीही चांगली.
६. उन्हाळ्यात दिवसात मुगाच्या डाळीचं सूप पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. मुगाच्या डाळीत दाह आणि सूजविरोधी घट्क असल्याने उष्माघात, शरीराचं तापमान वाढणं , तहान लागणं या उन्हाळ्यातल्या समस्यांचा धोका टळतो. मुगाचं सूप प्याल्यानं उष्माघाताचा धोका टाळण्याइतका ओलावा शरीरात निर्माण होतो.