अँटिलिया स्फोटक प्रकरण : सचिन वाझेंच्या कार्यालयातून लॅपटॉप, मोबाईल, कागदपत्रे जप्त

अँटिलिया स्फोटक प्रकरण : सचिन वाझेंच्या कार्यालयातून लॅपटॉप, मोबाईल, कागदपत्रे जप्त

Published by :
Published on

अँटिलिया स्फोटक प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या कार्यालयातून लॅपटॉप, मोबाईल तसेच काही कागदपत्रे एनआयएने जप्त केली आहेत. तर, एनआयएने या प्रकरणात तिसरी गाडी देखील ताब्यात घेतली आहे.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानानजीक एका स्कॉर्पिओ गाडीतून स्फोटके जप्त करण्यात आली. याप्रकरणी निलंबित एपीआय सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. तर, मुंबई पोलीस दलातील आतापर्यंत सात जणांची चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे या संबधित अधिकाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी होण्याची देखील शक्यता आहे. आयुक्तालयात वाझेंच्या गाडीची नोंद ठेवली जात नव्हती. तसेच त्या परिसरात सीसीटीव्ही नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वाझे यांच्या गाडीची ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत.

यादरम्यान एनआयएने आपल्या तपासाला वेग दिला असून मर्सिडीज कार ताब्यात घेतली आहे. या प्रकरणात एनआयएने आतापर्यंत ही तिसरी गाडी ताब्यात घेतली आहे. या आधी ज्या गाडीत स्फोटके आढळली ती स्कॉर्पिओ गाडी, त्याच्यासोबत घटनास्थळी आलेली इनो्व्हा गाडी एनआयएने ताब्यात घेतली आहे. आता ताब्यात घेतलेल्या मर्सिडिज कारमुळे नवा खुलासा होण्याची शक्यता आहे. या गाडीतून मनसुख हिरेन यांनी देखील प्रवास केला असल्याची माहिती आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com