भारत-चीन वाद : तब्बल १५ तास दोन्ही देशांदरम्यान चर्चा

भारत-चीन वाद : तब्बल १५ तास दोन्ही देशांदरम्यान चर्चा

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारत आणि चीनदरम्यान संघर्ष सुरूच आहे. पूर्व लडाख भागात सुरू असलेल्या तणावादरम्यान भारत आणि चीनदरम्यान कमांडर स्तरावरची नववी बैठक रविवारी पार पडली. तब्बल १५ तास चाललेली ही बैठक रविवार-सोमवारच्या मध्यरात्री जवळपास अडीच वाजता संपली.

मोल्डो भागात रविवारी सकाळी जवळपास साडेनऊ वाजता ही बैठक सुरू झाली होती. या बैठकीत भारताकडून सेनेच्या १४ कोअर कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन आणि चीनकडून दक्षिण शिनजियांग मिलिट्री रीजन कमांडर मेजर जनरल लियू लीन यांनी सहभाग घेतला.

भारत आणि चीनदरम्यान सैनिकांच्या मागे हटवण्यावरून व्यापक चर्चा पार पडली होती. डोंगराळ भागात वाद उद्भवणाऱ्या ठिकाणांवरून आपले सैनिक माघारी बोलावण्याची प्रक्रिया पुढे सरकावणं आणि तणाव कमी करणं ही चीनची जबाबदारी आहे, असं भारताचं म्हणणं आहे. पूर्व लडाखमध्ये विविध भागात भारतीय सेनेचे जवळपास ५० हजार जवान तैनात आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com