Kolhapur By Election : राजेश क्षीरसागरांचं बंड शमलं, मात्र खदखद भर मेळाव्यात बोलून दाखवली…
सतेज औंधकर, कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीपुर्वी (Kolhapur north Assembly Election) शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) नॉट रिचेबल येत असल्याने, क्षीरसागर बंड करणार का? अशी भीती महाविकास आघाडीला होती. मात्र आज महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित राहत बंडांच्या चर्चा उधळून लावल्या. क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांना आदेशाप्रमाणे काम करत संयम ठेवण्याचं आवाहन केलं आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant jadhav) यांच्या पत्नी जयश्री जाधव (Congress Candidate jayshree jadhav) यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर भाजपनं सत्यजीत कदम यांना उमदेवारी दिली आहे. त्यात करूणा शर्माही या निवडणुकीत उतरल्या आहेत. तर हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेल्यानंतर राजेश क्षीरसागर हे नाराज होते. तब्बल दोन दिवस नॉटरिचेबल येत असल्याने ते बंड करणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी आज माध्यमांसमोर येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करत मातोश्री आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ असल्याचं सांगत त्यांनी या पोटनिवडणुकीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश आपल्यासाठी प्रमाण आहे. ते जे सांगतील ते करणार मात्र कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी काम करावं आवाहन त्यांनी केलं तर 2024 साली कोल्हापूर उत्तर हा मतदार संघ काँग्रेस कडे नसून शिवसेने कडे असेल आपण त्यावेळी लढू अस त्यांनी म्हंटल.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसला सोडावा लागतं असलं तरी दु: ख वाटतंय. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी काम केलं पाहिजे. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्याशी प्रामाणिक होतो आणि राहणार आहे. दोन दिवसांपासून काँग्रेसला मतदारसंघ सोडल्यामुळं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची जी भावना आहे. ती उद्धव ठाकरे यांना कळवली आहे. 2024 ला ही जागा आपल्याला मिळेल, असं वरिष्ठांनी सांगितलं आहे. त्यामुळं पक्ष आदेशाप्रमाणं काम करुया असं राजेश क्षीरसागर म्हणाले.