India
JEE Mains 2021 | जेईई मेन्स परीक्षा होणार 17 जुलैला, निकाल 14 ऑगस्टला
जेईई मेनची परीक्षा 17 जुलै रोजी होणार आहे. तसेच निकाल 14 ऑगस्टपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या या परीक्षेला आता मुहूर्त मिळाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे.
देशभरातील 274 केंद्रांवर घेण्यात येणाऱ्या जेईई मेनमध्ये, 92,695 विद्यार्थी उपस्थित राहतील. परीक्षेच्या तारखांची घोषणा करताना मंडळाने सांगितले की, समुपदेशन प्रक्रिया तीन टप्प्यात केली जाईल आणि 15 सप्टेंबरपूर्वी पूर्ण केली जाईल. तसेच परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही, असेही मंडळाने म्हटले आहे.