आयटी रिटर्न फाईल करण्याची तारीख वाढवली; आता ‘ही’ असेल डेडलाईन

आयटी रिटर्न फाईल करण्याची तारीख वाढवली; आता ‘ही’ असेल डेडलाईन

Published by :
Published on

केंद्र सरकारनं इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. त्यामुळे आता 15 मार्चपर्यंत करदाते आपला रिटर्न फाईल करु शकतात. या निर्णयामुळे नागरीकांना दिलासा मिळणार आहे.

इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची तारीख याआधी 31 डिसेंबर 2021 पर्यंत होती. मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक लोक आयटी रिर्टन फाईल करु शकले नव्हते. त्यामुळे आता केंद्र सरकारनं इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख वाढवली आहेत.त्यामुळे आता 15 मार्चपर्यंत करदाते आपला रिटर्न फाईल करु शकतात.

आर्थिक वर्ष 2020-2021 चे टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2022 करण्यात आली आहे. लाईव्ह मिंटच्या एका वृत्तानुसार आता पुढील तीन महिन्यात करदाते आयकर परतावा भरु शकतील. आयटी रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख उलटून गेल्यानंतरही रिटर्न फाईल करण्याची संधी दिली जाते. त्याला बिलेटेड आयटीआर म्हणतात. त्याचे काही खास नियम आहेत. तसंच त्यात दंडाची आकारणीही होते. त्यामुळे आता करदाते कुठलाही दंड न भरता 15 मार्चपर्यंत आयकर परतावा भरु शकणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com