#IPL2021 | मुंबई इंडियन्स आज राजस्थान रॉयल्सशी सामना
मुंबई इंडियन्स गुरुवारी येथे आयपीएल सामन्यात सातत्याचा अभाव असलेल्या राजस्थान रॉयल्सशी सामना करण्यास सज्ज आहे .
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने एकूण 201 धावा करत स्पर्धेची सुरुवात तर चांगली केली आहे पण अद्याप त्याला कोणतीही मोठी खेळी करता आलेली नाही. सलामीचा साथीदार क्विंटन डी कॉक आणि रोहितच्या जोडीने मोठी भागीदारी रचण्याची आशा चाहत्यांना आहे. परंतु सूर्यकुमार यादव (154 धावा), ईशान किशन (73), हार्दिक पांड्या (36), कृणाल पांड्या (29) आणि किरोन पोलार्ड (65) या फटकेबाज फलंदाजांनी अद्याप त्यांच्या लौकिकाला साजेशा खेळ केलेला नाही. त्यामुळेच मुंबईच्या मधल्या फळीतील फलंदाजांना आता आपली गुणवत्ता सिद्ध करावीच लागेल.
गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट (6 विकेट) आणि जसप्रीत बुमराह (4) यांची वेगवान जोडी अपवादात्मक ठरली आहे. लेगस्पिनर राहुल चहर (9) आणि कृणाल (3) देखील प्रभावी ठरले आहेत. त्यांच्याकडूनही सातत्याची अपेक्षा आहे. तसेच हार्दिक पूर्णपणे फलंदाज म्हणून खेळत असतानाही पोलार्ड पाचवा किंवा सहावा गोलंदाज म्हणून वापरला जातो . अमित मिश्रानी दिल्लीसाठी केलेली कामगिरी लक्षात घेऊन रॉयल्सने एमआयची फलंदाजी रोखण्याचे लक्ष्य ठेवले असेल तर तेवतियाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
सामन्याची वेळ
दुपारी : 3ः30
ठिकाण ः अरुण जेटली स्टेडियम,
नवी दिल्ली
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्सवर