Investigation by Shiv Sena leader Yashwant Jadhav's house in Mumbai
Investigation by Shiv Sena leader Yashwant Jadhav's house in Mumbai

Shivsena Corporator Yashwant Jadhav | शिवसेनेचा आणखी एक नेता तपास यंत्रणेच्या रडावर!

Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

शिवसेनेचा (Shiv Sena) आणखी एक नेता केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आहे. मुंबईच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (BMC Standing Committee Chairman Yashwant Jadhav) यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या माझगाव येथील घरावर धाड टाकली आहे. ही धाड ईडी किंवा इन्कम टॅक्स नेमकी कोणी टाकली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, यशवंत जाधव यांना दोन दिवसांपूर्वी आयकर विभागाची नोटीस आली होती. त्यावरून ही इन्कम टॅक्सची धाड असल्याचा अंदाज आहे.

इन्कम टॅक्स अधिकारी सीआरपीएफ (CRPF) जवानांसह सकाळीच यशवंत जाधव यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी घरातच यशवंत जाधव यांची चौकशी सुरु केल्याचे समजते. सध्या त्यांच्या घरात कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. परंतु, यशवंत जाधव यांची नेमकी कोणत्या प्रकरणात चौकशी सुरू आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. यशवंत जाधव हे गेल्या पाच वर्षांपासून पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून सातत्याने केला जातो. त्यामुळे आता संजय राऊत यांच्यानंतर शिवसेनेचा आणखी एका नेता केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जातो

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ईडीचा कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेतेही ईडीच्या रडावर आहेत. अशातच महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांच्या नेत्यांवरही ईडीची नजर असून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांच्या मागे येत्या काही दिवसांत ईडीची पीडा लागणार असल्याची सूचक वक्तव्य अनेक भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत. तसेच, आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणाकडून होणारी चौकशी, शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com