अवैध बार परवाना प्रकरण; समीर वानखेडेंची मुंबई उच्च न्यायालयात धाव
NCBचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना ठाणे पोलिसांनी समन्स बजावले आहे. (Thane police summons) मद्यविक्री परवान्यासाठी खोटी माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांना उद्या (23 फेब्रुवारी) कोपरी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र या कथित फसव्या बार परवान्याविरोधातील ठाणे पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी करत समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दुसरी याचिका दाखल केली.
समीर वानखेडे यांच्याविरोधात ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल करताना खोट्या माहितीच्या आधारे मद्यविक्री परवाना (Liquor sales license based on false information) मिळवला असल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आला. त्यानंतर या समीर वानखेडे यांनी ठाणे जिल्हाधिकार्यांनी रद्द केलेला बार परवाना पूर्ववत करण्याची मागणी करणारी दुसरी याचिका दाखल केली.