India
बाबा रामदेव ‘सर्वोच्च’ अडचणीत’; मूळ तपशील सादर करण्याचे निर्देश
अॅलोपॅथी औषधांच्या वापराबाबत केलेल्या वक्तव्यांचा मूळ तपशील आपल्यापुढे सादर करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बाबा रामदेव यांना सांगितले.
'त्यांनी मुळात काय म्हटले आहे? तुम्ही सारे काही आमच्यापुढे ठेवलेले नाही', असे सरन्यायाधीश एन.व्ही. रमण, न्या. ए.एस. बोपण्णा व न्या. हृषीकेश रॉय यांच्या खंडपीठाने रामदेव यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना सांगितले. त्यावर, आपण मूळ ध्वनिचित्रफीत व त्याची प्रतिलिपी (ट्रान्स्क्रिप्ट) दाखल करू, असे रोहतगी म्हणाले. न्यायालयाने ते मान्य करून सुनावणी ५ जुलैला ठेवली आहे.