Railway Ministry रेल्वेत सुरु होणार जनरल तिकीट
रेल्वे प्रवाशांसाठी (Railway Ministry)रेल्वे मंत्रालयाकडून मोठी दिलासादायक बातमी दिली आहे. आता लांब पल्ल्यांच्या रेल्वेमध्ये पुन्हा एकदा अनारक्षित डब्यांची (Unreserved Coach)व्यवस्था सुरू होत आहे. रेल्वेने अनारक्षित डब्यांची जुनी व्यवस्था पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे जनरल डब्यातून (General Coach)प्रवास करणा-या सामान्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. (Indian Railway)
यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आदेशात म्हटले की, सर्व गाड्या पूर्वीप्रमाणे पूर्ववत करण्यात आल्या आहे. जनरल डब्यांची जुनी व्यवस्था पूर्ववत करण्यास मान्यता दिली आहे. आता रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच साधारण तिकीट घेऊन ट्रेनमध्ये प्रवास करता येणार आहे. यासोबतच आता प्रवाशांना जनरल तिकीट काढण्यात कोणतीही अडचण येणार नाही. कोरोना महासाथीनंतर रेल्वेने ट्रेनमधून अनारक्षित प्रवासाची सुविधा काढून घेतली होती. महासाथीच्या आजारापूर्वीच्या व्यवस्थेप्रमाणेच आता प्रवाशांना द्वितीय श्रेणीच्या डब्यातून प्रवास करण्यासाठी स्थानकावर जाऊन सामान्य तिकीट खरेदी करता येणार आहे.