India-China Standoff | भारत-चीन दरम्यान आज लष्करी बैठक

India-China Standoff | भारत-चीन दरम्यान आज लष्करी बैठक

Published by :
Published on

भारत आणि चीनच्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आज दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची बैठक सकाळी 10.30 वाजता होणार आहे. या दोन देशांदरम्यानची ही 12 वी बैठक असून हॉट स्प्रिंग आणि गोगरा भागातील चीनने आपलं सैन्य माघारी घ्यावी अशी भारताची भूमिका असल्याची माहिती समोर येत आहे.

गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याच्या चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीला जवळपास सव्वा वर्ष पूर्ण झालं आहे. मागील वर्षी 15 जून रोजी चीनच्या सैनिकांनी गस्तीच्या वेळी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय जवानांवर हल्ला केला होता. यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली होती. या झटापटीत भारताचे 20 सैनिक शहीद झाले होते, तर चीनने केवळ चार सैनिकांचा मृत्यू झाल्याचं कबूल केलं होतं.

भारत आणि चीन दरम्यान आजची ही 12 वी बैठक आहे. हॉट स्प्रिंग आणि गोगरा या भागातून चीन आपले सैन्य माघार घेणार का याकडे भारताचं लक्ष लागलं असून त्या दृष्टीने ही बैठक महत्वाची ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com