भारत बायोटेकची बूस्टर डोसची चाचणी सुरू

भारत बायोटेकची बूस्टर डोसची चाचणी सुरू

Published by :
Published on

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला जात आहे. यासाठी भारत बायोटेक बूस्टर डोसची चाचणी सुरू करणार आहे.

भारत बायोटेक आयसीएमआर आणि एनआयव्हीच्या सहकार्यानं कोवॅक्सिनच्या बूस्टर डोसची चाचणी घेणार आहे. कोवॅक्सिनच्या तिसऱ्या डोसच्या चाचणीला लवकरच सुरुवात होईल. या चाचणी दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील चाचणीत सहभागी झालेल्या काही स्वयंसेवकांना बूस्टर डोस देण्यात येईल. कोरोना प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी हा डोस रोगप्रतिकारशक्ती किती वाढवतो, याची चाचपणी भारत बायोटेककडून करण्यात येणार आहे. आतापर्यंतच्या चाचणीत बूस्टर डोस ८१ टक्के प्रभावी ठरला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com