देशातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ
देशात गेल्या २४ तासांत ४१ हजार ९६५ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण उप्चाराधीन रुग्णांचा आकडा ३ लाख ७८ हजार १८१ वर पोहोचला आहे. तसेच गेल्या २४ तासांत देशात ३३ हजार ९६४ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
देशात आतापर्यंत एकूण ३ कोटी २८ लाख १० हजार ८४५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी, ३ कोटी १९ लाख ९३ हजार ६४४ इतके रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, गेल्या २४ तासांत देशात ४६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामुळे, देशातील कोरोनाची एकूण मृत्यूसंख्या ४ लाख ३९ हजार २० वर पोहोचली आहे.
देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्न्वाध ही केरळमध्ये होत असल्याचं दिसून येत आहे. देशात २४ तासांत नोंद झालेल्या ४१ हजार ९६५ नव्या करोनाबाधितांपैकी ३० हजार २०३ रुग्ण एकट्या केरळमधील आहेत. तर देशातील ४६० मृत्यूंपैकी ११५ मृत्यू हे केरळमध्ये झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
आतापर्यंत देशातील कोरोना लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या 65 कोटी 41 लाख 13 हजार 508 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी:
देशात 24 तासातील नवे रुग्ण – 41,965
देशात 24 तासातील डिस्चार्ज – 33,964
देशात 24 तासातील मृत्यू – 460
एकूण रूग्ण – 3,28,10,845
एकूण रिकव्हरी- 3,19,93,644
एकूण मृत्यू – 4,39,020
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 3,78,181